Media Control Online
WhatsApp ने एक समर्पित WhatsApp ‘सेफ्टी इन इंडिया’ रिसोर्स हब लाँच केले आहे. जे लोकांना ऑनलाइन सुरक्षित राहण्यास मदत करण्यासाठी विविध सुरक्षा उपायांची रूपरेषा देते. इंटरनेटच्या सुरक्षित वापराला चालना देण्यासाठी WhatsApp च्या आठवडाभर चालणाऱ्या #TakeCharge मोहिमेला अनुसरून रिसोर्स हबची सुरूवात झाली. व्हॉट्सअॅपने एका निवेदनात म्हटले आहे, “आम्ही WhatsApp वर करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा केंद्रबिंदू आमच्या युजर्सची सुरक्षितता आहे आणि युजर्सना त्यांच्या ऑनलाइन सुरक्षिततेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी समर्पित ‘सेफ्टी इन इंडिया’ रिसोर्स हब सुरू करत आहोत.”व्हॉट्सअॅपने असेही म्हटले आहे की, “गेल्या काही वर्षांत, आम्ही युजर्सची सुरक्षा आणि गोपनीयता वाढविण्यात मदत करण्यासाठी उत्पादनात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.
सतत उत्पादनाच्या नाविन्यपूर्णते व्यतिरिक्त, आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा वैज्ञानिक, तज्ञ आणि प्रक्रियांमध्ये सतत गुंतवणूक केली आहे. रिसोर्स हब ऑनलाइन सुरक्षितता, गोपनीयता आणि सुरक्षितता यासंबंधी महत्त्वाच्या विषयांवर संशोधन करते, सामान्य गैरसमज दूर करते आणि आजच्या डिजिटली कनेक्टेड जगात संभाव्य सायबर घोटाळ्यांपासून युजर्स स्वतःचे संरक्षण कसे करू शकतील याबद्दल जागरूकता निर्माण करते. ‘सेफ्टी इन इंडिया’ हबद्वारे, WhatsApp चे उद्दिष्ट जागरूकता निर्माण करणे आहे. जे युजर्सना सेवा वापरताना त्यांच्या सुरक्षिततेवर नियंत्रण ठेवण्यास, सक्षम ठेवण्यात मदत करते. रिसोर्स हब प्रगत तंत्रज्ञानाविषयी देखील भाष्य करते.
जे WhatsApp भारताच्या विशिष्ट प्रक्रियेसह हायलाइट करते. प्लॅटफॉर्मवर चुकीच्या माहितीचा प्रसार आणि कोणत्याही प्रकारचा गैरवापर रोखण्यात मदत करते. “आम्हाला आशा आहे की, हे संसाधन युजर्सना त्यांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी आणि सुरक्षितपणे इंटरनेट नेव्हिगेट करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीसह सुसज्ज करेल. असेही WhatsApp तर्फे सांगण्यात आले. नुकतेच मेसेजिंग एप्लिकेशन्स WhatsApp ने आपल्या यूजर्ससाठी भन्नाट तीन नवीन फीचर जारी केले असून यामध्ये वॉइस कॉल, फॉरवर्डिंग वॉइस नोट्स आणि इमोजी शॉर्टकटशी संबंधित फीचरचा समावेश आहे. फॉरवर्डिंग वॉइस नोट्समध्ये अपडेटद्वारे वॉइस नोट रिसिव्ह झाल्यानंतर फॉरवर्डेड आहे की नाही, याची माहिती यूजर्सला मिळेल. व्हॉईस कॉल अपटेडमुळे आयफोन यूजर्सला ग्रुप कॉल दरम्यान वेवफॉर्म पाहायला मिळतील.