कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२६ : तमाम रसिकांना भावेल असा मनोरंजनाचा सुपर फॉर्म्युला गवसलेले दिग्दर्शक मिलिंद कवडे टकाटक च्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक नवीन कहाणी घेऊन आले आहेत ही कहाणी साधीसुधी नसून एक नंबर… सुपर आहे कारण मिलिंद कवडेंच्या आगामी सिनेमाचं नावचं ” एक नंबर…. सुपर” असं सुपरहिट आहे.
‘बाबुराव’.. आणि ‘तुकडे तुकडे’..
या गाण्यांवर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले आहेत. ट्रेलर आणि गाण्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबतच मराठी सिनेसृष्टतीही उत्सुकता शिगेला पोहचणारा ‘ एक नंबर… सुपर’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नेहमीच प्रवाहा पेक्षा काहीतरी वेगळं देण्याच्या प्रयत्नात असलेल्या मिलिंद यांनी एक नंबर सुपर या चित्रपटातही तीच परंपरा कायम ठेवली आहे लेखन दिग्दर्शनासोबतच निर्मितीची धुरा संभाळत एक नवं पाऊल टाकलं आहे. महेश धुमाळ आणि जितेंद्र धमाल यांच्या साथीने मिलिंद कवडे यांनी धुमाळ प्रोडक्शन च्या बॅनरखाली औट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगान ‘एक नंबर सुपर’ ची निर्मिती केली आहे.
मराठी सिनेसृष्टीतील सध्याचा हुकमी एक्का मानला जाणारा प्रथमेश परब टकाटक तर पुन्हा मिलिंद यांच्या एक नंबर सुपर मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहेत चित्रपटातील दोन्ही गाण्यातील प्रथमेश चा परफॉर्मन्स प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे आता प्रत्यक्ष सिनेमाच्या माध्यमातून प्रथमेश रसिकांच्या मनावर छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे एक नंबर सुपर सायकलवरून चित्रपटाच्या कथानकाचा जराही अंदाज लावता येत नाही त्यामुळेच दिवसागणिक या चित्रपटाची अधिक अधिक वाढत आहे विनोदी कथानक आणि त्याला साजेसा कलाकारांचा उत्तम अभिनय हे हे या चित्रपटाचं मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे प्रत्येक कॅरेक्टर ची वेगळी ओळख मुख्य कलाकारांच्या साथीला सर्व कलाकारांची लक्षवेधी कॅरेक्टर्स कथेच्या प्रवाहाशी एकरूप होऊन मनोरंजन करणारी गाणी अर्थपूर्ण शब्द रचना मन मोहित संगीतरचना उत्कंठावर्धक पटकथा लेखन मनाला भिडणारे संवादलेखन आणि दर्जेदार निर्मितीमूल्ये यांच्या साथीने दिल दिग्दर्शित केलेला उत्तम सिनेमा एक नंबर वर्णन करता येईल.
चित्रपटात मिलिंद शिंदे गणेश यादव, निशा परुळेकर ,अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापुरकर ,अक्षता पाडगावकर, प्रणाली संगमित्रा ढावरे, सुमित भोस्क सुनिल मगरे, हरीश थोरात आकाश कोळी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत चित्रपटाची कथा लिहिणारे मी मिलिंद म्हणाले की एक नंबर सुपर च्या माध्यमातून आम्ही एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपट बनवला आहे आणि प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी असलेल्या चित्रपट प्रेक्षकच सुपरहीट ठरवतील अशी आशा आहे. माझ्या आजवरच्या चित्रपटाप्रमाणेच विनोदाच्या सहाय्यान एक महत्त्वपूर्ण विचार समाज आणि जन्म माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न एक नंबर सुपर हा चित्रपट करेल अशी आशाही मिलिंद यांनी व्यक्त केली नवगिरे यांनी या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिला आहे तर संकलनाची बाजू प्रणव पाटील यांनी सांभाळली आहे डिओपी हजरत शेख यांच्या अनोख्या सिनेमॅटोग्राफीच्या माध्यमातून एक नंबर सुपर हा चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे