सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह उत्साहात…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 45 Second

ईशा देसाई,कोल्हापूर प्रतिनिधी-

सेनापती कापशी: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यामध्ये ५१ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा झाला. कारखान्याचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात जनरल मॅनेजर श्री. घाटगे म्हणाले, मानवी जगण्यामध्ये औद्योगिक सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. औद्योगिक सुरक्षा पाळण्यामध्येच कामगार व कर्मचाऱ्यांचे सर्वांगीण कल्याण व हीत आहे. साखर कारखानदारीमध्ये काम करताना कर्मचारी व कामगारांनी सुरक्षेला प्राधान्य दिलेच पाहिजे.

या सुरक्षा सप्ताहामध्ये सुरक्षा निबंध, सुरक्षा घोषवाक्य , सुरक्षा चित्र असे विविध कार्यक्रम घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

साखर कारखान्याचे सुरक्षा अधिकारी नितीन धामणकर यांनी कर्मचाऱ्यांना सुरक्षितता उपकरणांची हाताळणी याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *