कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे : निवडणुक अधिकारी श्रावण क्षीरसागर

कोल्हापूर/प्रतिनिधी  दि. १४ : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे मतदारसंघाची एक जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या एका जागेकरिता  भारत निवडणूक आयोगाने पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणूक कार्यक्रम –

Advertisements

निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक- १७ मार्च २०२२ (गुरुवार)

नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक-२४  मार्च २०२२ (गुरुवार)

नामनिर्देशन पत्राची छाननी- २५ मार्च २०२२ (शुक्रवार)

उमेदवारी अर्ज माघे घेण्याचा अंतिम दिनांक – २८ मार्च २०२२ (सोमवार)

मतदानाचा दिनांक- १२ एप्रिल २०२२ (मंगळवार)

मतमोजणी दिनांक- १६ एप्रिल २०२२ (शनिवार)

निवडणूक प्रक्रिया पूर्ण  करण्याचा दिनांक -१८ एप्रिल २०२२ (सोमवार)

२७६ -कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदारसंघ क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *