गुल्हर ” मराठी चित्रपट येत्या ८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 39 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१४ : आपल्या नावात वेगळेपण असलेल्या “गुल्हर ” हा मराठी चित्रपट येत्या ८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती या चित्रपटाच्या टीम ने आज कोल्हापूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत दिली . या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविला आहे .

“गुल्हर ” या चित्रपटाची निर्मिती शांताराम (आप्पा) मेदगे , शिवाजी भिंताडे , अनुप शिंदे , अबिद सय्यद यांच्या आयडियल व्हेंचर या बॅनरखाली केली आहे . या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शक रमेश चौधरी यांनी काहीसा आव्हानात्मक चित्रपट बनवण्याचे धाडस केले आहे . प्रवाहापेक्षा वेगळं कथानक असणारा हा चित्रपट वेगवेगळ्या वैशिष्ट्याने सजला आहे. या चित्रपटाचे कथानक धनगर समाजातील एका अकरा वर्षाच्या मुलाच्या भोवती गुंफण्यात आले असून त्यादृष्टीने ती गोष्ट पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात विनायक पोद्दार, रवी काळे ,भार्गवी चिरमुले ,सुरेश विश्वकर्मा ,किशोर चौगुले , रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर, गणेश कोकाटे, कपिल कदम , पुष्पा चौधरी , आनंद अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा मोहन पडवळ यांनी लिहिली असून पटकथा आणि संवाद संजय नवगिरे यांनी केले आहे. वैभव कुलकर्णी यांच्या गाण्यांना पद्मनाथ गायकवाड यांनी स्वरसाज चढवला आहे. छायालेखन आणि संकलन कुमार डोंगरे यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या आठ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल असा आशावाद यावेळी या चित्रपटाच्या टीमने दिला यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश चौधरी अभिनेत्री शिवानी बावकर ,अभिनेते आनंद अभ्यंकर ,विनायक पोद्दार आदी उपस्थित होते

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *