पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते शिरोली ग्रामपंचायत विविध विकास कामाचे लोकार्पण सोहळा….

0 0

Share Now

Read Time:4 Minute, 41 Second

प्रतिनिधी रविना पाटील: ग्रामपंचायत शिरोली विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा मा.नामदार श्री सतेज उर्फ बंटी पाटील पालकमंत्री कोल्हापूर यांच्या शुभ हस्ते १० लाख रुपयाचा शिवा फौंडेशनच्या हॉलचे व ग्रामपंचायतच्या १५ वा वित्त आयोगातून नवीन ट्रॅक्टर ट्रॉली ,रुग्णवाहिका .पाण्याचा ५ ह्जार लिटरचा टँकर , शववाहिका , औषध फवारणीसाठी ट्रॅक्टर अशा वहानांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच शशिकांत बापूसो खवरे (भाऊ) होते व प्रमुख पाहुणे आमदार राजूबाबा आवळे होते .
प्रास्ताविक करताना शशीकांत खवरे सरपंच म्हणाले शिरोली गावातील सामान्य नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या सर्व सदस्याना विश्वासात घेऊन मी गावासाठी ट्रॅक्टर ट्रोली ,रुग्णवाहिका ,शववाहिका पाण्याचा ट्रंकर ,औषध फवारणी ट्रॅक्टर संकल्प पूर्ण केला.

यावेळी आमदार म्हणाले शिरोलीतील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कोठ्यावधी रुपयाची विकास कामे मार्गी लावली आहेत यापुढे हि निधी शिरोली गावासाठी कमी पडणार नाही.
आमदा राजूबाबा आवळे म्हणाले शिरोली गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत सुख सुविधा पुरविणे फार अवघड आहे, त्यामुळे नगरपरिषद व्हावी असे वाटते गावामध्ये गेली साडे चार वर्षे बरीचशी कामे शशिभाउंनी मार्गी लावली आहेत . खरोखरच शशिभाऊंचे कौतुक केले पाहिजे

तसेच पालकमंत्री म्हणाले गेली साडेचार वर्षे विकास कामाचे बॅटिंग करणारे शिरोली गावचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे भाऊ शिरोली ग्रामपंचायतवर गेली साडेचार वर्षे सक्षम नेतृत्व गावकरी यांनी दिला . आज कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहेत. पाण्याचा ट्रंकर , ट्रॅक्टर रुग्णवाहिका ,शववाहिका , औषध फवारणी असेल हे पाच ही विषय एकाच वेळी गावातील हाताळायचे त्याला प्रचंड ताकद लागते बुद्धीमता लागते.
असे लहान विषय असून पण सामान्य माणसांच्या दृष्टीने महत्वाचे असतात येत्या आठवड्यात राजु बाबा आवळे आणि आम्ही प्रांतांना बोलाऊन घेऊन अतिक्रमण मधील ७/१२ देण्याचे काम करुया
पहिला व दुसरा डोस ९८ टक्के पूर्ण झाल्या बद्दल शिरोलीकरांचे पालकमंत्री यांनी कौतुक केले.

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणसाठी माझ्याकडून २५ लाख रुपयांचा निधी देत आहे माझी एक इच्छा आहे प्रत्येक गावामध्ये खेळाची क्रीडांगणे झाली पाहिजे असे वाटते .

पुन्हा एकदा शशिभाऊचे मनापासून अभिनंदन करतो असेच काम शिरोली गावामध्ये करावीत माझी कोठे मदत लागलेस मी देण्यास तयार आहे.

यावेळी उपसरपंच श्री सुरेश यादव, नगरसेवक प्रविण केसरकर ,ग्रामविकास अधिकारी व्ही.बी.भोगण ,मा.जि.प सदस्य महेश चव्हाण , तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील उत्तम सावंत ,सरदार मुल्ला ,विठ्ठल पाटील ,उर्मिला जाधव ,अनिता कांबळे, राजश्री उनाळे ,प्रकाश कौंदाडे , जोतिराम पोर्लेकर ,उत्तम पाटील ,मुन्ना सनदे, ,दिपक खवरे ,बाजीराव जाधव ,राजकुमार पाटील व गावातील माजी आजी सदस्य व मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *