देशात जून पर्यंत येऊ शकते कोरोना ची चौथी लाट? भारत सरकारचा सर्व राज्यांना सावधानतेचा इशारा…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 27 Second

Media Control Online

देशातील करोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी, नुकताच विदेशात सापडलेल्या ओमिक्रॉनच्या डबल व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे. करोनाची नवीन लाट येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. भारत सरकारनेही यासंबंधी सावधानतेचा इशारा दिला आहे.

दक्षिण कोरिया, चीनमध्ये करोनाचे नवे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. त्याचवेळी मध्य आशियाई देश इस्रायलमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत, ज्यांच्यामध्ये करोनाचा नवीन व्हेरियंट आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सांगितले जात आहे. बुधवारी इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन प्रवासी करोनाबाधित सापडले असून, त्यांच्यात ओमिक्रॉन व्हेरियंट बीए. १ आणि त्याचा सबव्हेरियंट बीए. २ असा एक व्हेरियंट आढळून आला आहे, असे सांगितले. या देशांमध्ये करोनाच्या नवीन व्हेरियंटचा होत असलेला फैलाव आणि वाढती रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ओमिक्रॉन विषाणूमुळे करोनाची नवीन लाट येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या नवीन व्हेरियंटचे रुग्ण पूर्व युरोपमध्ये आढळून आलेले आहेत. त्यामुळेच अर्मेनिया, अरबैजान, बेलारूस, जॉर्जिया, युक्रेन आणि रशियात करोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. हॉंगकाँग, दक्षिण कोरिया या देशांमध्येही करोना रुग्ण वाढलेले दिसून येतात. दुसरीकडे, जूनपर्यंत करोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे, असे आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले होते.

भारत सरकारने दिला सावधानतेचा इशारा

युरोप तसेच आशियाई देशांमध्ये करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करोनाबाबत सावध राहावे, अशा सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मालविया यांनी बुधवारी बैठक घेतली. यात वरिष्ठ आरोग्य अधिकारी होते. युरोप व पूर्व आशियाई देशांमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने उपाययोजनांसंबंधी चर्चा झाली. पुन्हा जेनोमिक सिक्वेन्सिंग हाती घ्यावे, आरोग्य कर्मचाऱ्यांनी दक्षता बाळगावी, असा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिल्याचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *