आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शपथ घेतो की स्वराजाच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला त्याला अनुसरुन महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून प्रयत्नाची पराकाष्टा करू : राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी : तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील शिवाजी पार्कात सोहळ्याचे आयोजन केलं आहे. शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांच्या उपस्थिती सोहळा साजरा होत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी शिवजयंतीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे. तर, शिवजयंतीच्या निमित्ताने राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना शपथ दिली आहे.

शिवाजी पार्कमध्ये ढोल- ताशांच्या गजरात आज शिवजयंती साजरी होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांसोबत व लहानग्या मुलांसोबत संवाद साधला. व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत केलं. या दरम्यान राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना शपथ दिली. कार्यकर्तांना शपथ देताना राज ठाकरेंनी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

Advertisements

आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शपथ घेतो की स्वराजाच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला त्याला अनुसरुन महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून प्रयत्नाची पराकाष्टा करू. हे स्वराज्या स्थापन करताना जातीजातीत विभागला गेलेला समाज एक राहील. महिलांना आत्मसन्मान, नागरिकांना आरोग्य व्यवस्था मिळेल, इथली शहर, गावं, तांडे सुंदर व सुरक्षित असतील, भ्रष्टाचार नष्ट होईल, यासाठी प्रयत्न करु

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *