Share Now
Read Time:1 Minute, 19 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – शिरूर लोकसभा मतदारसंघातून चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेना उमेदवार विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का बसताना दिसत आहे. चौथ्या फेरीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर आहेत.
डॉ. कोल्हे यांनी सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली आहे. चौथ्या फेरीनंतर डॉ. कोल्हे यांना वीस हजार मतांची आघाडी आहे. जुन्नर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून डॉ. कोल्हे आघाडी घेताना दिसून येत आहेत. तसेच खेड आळंदी आणि शिरूर मतदारसंघातून देखील कोल्हे पुढे जात आहेत. तर हडपसर आणि भोसरी मधून आढळराव यांना मताधिक्य आहे.
शिवाजीराव आढळराव-पाटील : 209549; डॉ. अमोल कोल्हे 225064
शिरूर लोकसभा मतदारसंघ:
अमोल कोल्हे – 258650
आढळराव पाटील – 242669
कोल्हे आघाडी = 15981
Share Now