मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात पवार घराण्याला मोठा धक्का बसल्याचे पहायला मिळत आहे.
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी तब्बत 80 हजार 145 मतांची निर्णयाक आघाडी घेतली आहे.
Advertisements

आतापर्यंत एकूण पाच लाख सात हजार 590 मतांची मोजणी झाली आहे. त्यापैकी श्रीरंग बारणे यांना 2,69,553 मते तर पार्थ पवार यांना 1,89,408 मते मिळाली आहेत.
