Baramati : लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांचा विजय पक्का; भाजपच्या कांचन कूल होणार पराभूत

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचा विजय पक्का झाला असून केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. सुप्रिया सुळे यांना 6,49,415 मते तर, कांचन कुल यांना 4,92,373 मते मिळाली. आहेत. सुप्रिया सुळे यांनी तब्बल 1,57,042 मतांची आघाडी मिळवत विजय पक्का आहे. सुळे यांनी पक्ष आणि पवारांची प्रतिष्ठा राखली आहे. यामुळे यंदा बारामती जिंकणारच म्हणून दंड थोपटणाऱ्या भाजपचा फुगा अखेर फुटला आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत.
सुप्रिया सुळे यांना एकूण६४९४१५ मते तर भाजप उमेदवार कांचन कुल यांना ४९२३७३ मते मिळाली आहेत. सुळे यांचा १५७०४२ मतांनी विजयी झाल्या आहेत.

Advertisements

पवार घराण्याचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणारा बारामती मतदारसंघ स्वतःकडे टिकवून ठेवण्यासाठी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसला झगडावे लागले. सुरुवातीला अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी कांचन कुल यांच्यावर मात करीत विजय मिळवलाय.

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपने मोठे आव्हान उभे केले होते, केंद्र आणि राज्यातल्या जवळपास डझनभर मंत्र्यांनी बारामतीमध्ये सभा घेतल्या होत्या. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे मतदारसंघात तळ ठोकून होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी आपला गड राखला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *