२७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक : आजपर्यंत आठ उमेदवारांकडून आकरा नामनिर्देशनपत्र दाखल..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी काल राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक (अपक्ष) व संतोष गणपती बिसुरे (पक्ष- लोकराज्य जनता पार्टी) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्याकडे एक नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

 

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज यशवंत कृष्णा शेळके [नॅशलन सोशालिस्ट पार्टी (युनायटेड)], सत्यजित (नाना) कदम (भारतीय जनता पार्टी), सीमा शशिकांत कदम (भारतीय जनता पार्टी), सुभाष वैजु देसाई (अपक्ष), जयश्री चंद्रकांत आण्णा जाधव  (इंडियन नॅशनल काँग्रेस), विजय शामराव केसरकर (लोकराज्य जनता पार्टी) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

Advertisements

 

आजपर्यंत 8 उमेदवारांनी 11 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *