विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४ : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२
कोरोना मुळे दोन वर्षानंतर सुरू झालेल्या फुटबॉल हंगामाचे अजिंक्यपद कोण पटकावणार याची उत्सुकता तमान फुटबॉल प्रेमींना लागली आहे. स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असुन विजेतेपदासाठी आज पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध शिवजी तरुण मंडळ आमने सामने येणार आहेत. आज चार वाजता हा सामना होणार असुन, शाहु स्टेडियम हाऊसफुल्ल होणार यात काय शंका नाही. स्पर्धेत सहा फेऱ्या पूर्ण झाल्या असून सहाव्या फेरी पर्यंत शिवाजी तरुण मंडळ चे १३ गुण, तर पाटाकडील तालीम मंडळ चे १२ गुण आहेत. त्यामुळे पीटिएम विरूद्ध सामन्यात शिवाजी ला विजय किंवा बरोबरी पुरेशी आहे. परंतु पीटिएम ला या सामन्यात विजयी हाच एकमेव पर्याय आहे.त्यामुळे आजचा सामना खूप रंगतदार होणार आहे.
*सायबर वॉच*
आजच्या अंतीम सामन्यात पीटिएम व शिवाजी विजेतेपदासाठी आक्रमक प्रयत्न करणार आहेत. सामना हायव्होल्टेज होणार असल्याने प्रेक्षकांची गर्दी खूप जास्त असणार आहे. सामना शांततेत खेळला जावा याकरिता पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
मैदनवरील CCTV Active करण्यात आले आहेत. तसेच दोन्ही टीम ना जुना राजवाडा पोलिस स्टेशन मध्ये बोलवून सूचना देण्यात आल्या आहेत.