हमिदवाडा प्रतिनिधी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले.
दिनांक २२/०२/२०२२ रोजी ग्रामपंचायत हमिदवाडा यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तळ्यातील गाळ काढण्यास संदर्भात लेखी निवेदन दिले होते पण एक महिना होऊनही त्यावर कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने , मनसे कडून गावतळ्यातला गाळ काढून मिरवणूक काढत , वाजत-गाजत हमीदवाडा ग्रामपंचायत च्या दारात टाकून आंदोलन करण्यात आले, तसेच अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
जोपर्यंत ग्रामपंचायतकडून ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतच्या दारातुन उठणार नाही, असा निर्णय आंदोलनकर्त्यांकडून घेण्यात आला . त्यानंतर ग्रामविकास अधिकारी एन आर मगदूम साहेब व सरपंच सौ.सुमन विलास जाधववहिनी यांनी ग्रामपंचायत मार्फत तळ्यातील गाळ येत्या आठ दिवसात काढायला सुरू करू असे लेखी आश्वासन दिले .
त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाउपाध्यक्ष रोहन निर्मळ, कामगार सेना जिल्हाउपाध्यक्ष संजय पाटील , कागल तालुकाध्यक्ष सौरभ पोवार, विभाग अध्यक्ष रणजित वासनकर, शाखाअध्यक्ष विकास पाटील , शाखा उपाध्यक्ष शंकर गंदुगडे, शाखा सचिव शशिकांत मोरबाळे, कार्याध्यक्ष सताप्पा पाटील ,दीपक बुरटे,रोहित बुरटे, अंकुश दूरडे, समर्थ पोटे , सुशांत मोरे, गजानन जत्राटे , शिवतेज विभुते ,पिंटू यादव , महेश पारले,प्रथमेश ठाणेकर, सुनील चव्हाण ,वैभव नार्वेकर ,व महाराष्ट्र सैनिक , ग्रामस्थ उपस्थित होते.