शिंगणापूर पाणी उपसा यंत्रामध्ये बिघाड झाल्याने १ एप्रिलपासून एक दिवस आड पाणी पुरवठा..!

कोल्हापूर /प्रतिनिधी : शिंगणापूर योजनेवरील पाणी उपसा यंत्रामध्ये बिघाड झाल्याने या योजनेवरील चार पंपांचा पाणी उपसा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे ए/बी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे ग्रामिण भागातील दैनंदिन पाणी पुरवठा पूर्ण क्षमतेने होत नाही. त्यामुळे शिंगणापूर योजनेवरून नागरीकांना होणारा पाणी पुरवठा शुक्रवार, दिनांक १ एप्रिल २०२२ पासून एक दिवस आड करण्यात आला आहे. यासाठी ए/बी वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे ग्रामीण भागास शुक्रवार, दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी पाणी पुरवठा होईल व ई वॉर्ड व त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भागास शनिवार, दिनांक २ एप्रिल २०२२ याप्रमाणे एक दिवस आड पाणी पुरवठयाचे नियोजन करण्यात आले आहे.

यामध्ये ए, बी, वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे, ग्रामिण भाग व शहराअंतर्गत येणा-या संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरूजी वसाहत, राजेसंभाजी परिसर, क्रशरचौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, साळोखेनगर टाकीवरील संपूर्ण भाग, जरगनगर, क्रांतीसिंहनाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, कळंबा फिल्टरवरील अवलंबून असलेला संपूर्ण भाग, शिवाजी पेठ परिसरातील काही भाग, संपूर्ण मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, गजानन महाराजनगर, टिंबर मार्केट, मंडलिक वसाहत, मंगेशकर नगर, सुभाषनगर पंपींगवरील अवलंबून असणारा परिसर, शेंडापार्क टाकीवरील अवलंबून असणारा परिसर, जवाहरनगर, सुभाषनगर पंपींगवरील संपूर्ण भाग, वाय पी पोवार नगर, मिरजकर तिकटी इत्यादी ठिकाणी शुक्रवार, दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी पाणी पुरवठा होईल.

तसेच संपूर्ण राजारामपुरी १ ली ते १३ वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, शाहुमिल कॉलनी, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, साईक्स एक्स्टेंन्शन, पाचबंगला, कोरगावकर परिसर, राजाराम रायफल परिसर, माळी कॉलनी, मोहल्ला परिसर, छत्रपती कॉलनी, दिघे हॉस्पिटल परिसर, पांजरपोळ, सम्राटनगर, प्रतिभानगर, पायमल वसाहत, जगदाळे कॉलनी, आयडीयल सोसायटी, तोरणानगर, काशिद कॉलनी, माने कॉलनी, चानाक्यनगर, एसटी कॉलनी, संयुक्त महाराष्ट्र सोसायटी, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन परिसर, ग्रीनपार्क परिसर, शाहुपूरी १ ली ते ४ थी गल्ली, व्यापार पेठ, शिवाजी पार्क, रूईकर कॉलनी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल, महाडीक वसाहत, मार्केटयार्ड इत्यादी ठिकाणी शनिवार, दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी पाणी पुरवठा होईल याप्रमाणे एक दिवस आड पाणी पुरवठयाचे नियोजन करण्यात आले आहे. एक दिवस आड पाणी पुरवठा होणार आहे. पंप दुरूस्तीचे कामकाज पूर्ण होताच पाणी पुरवठा पुर्ववत करण्यात येईल. याची संबधीत भागातील नळ कनेक्शनधारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *