महापालिकेच्या महसूली उत्पन्नामध्ये ३८०.६३ कोटी महसूल जमा…!

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 49 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत विविध विभागाकडून महसूली उत्पन्नामधून ३८०.६३ कोटी महसूल जमा झाला आहे. यामध्ये नगररचना विभागाने ६६.६० कोटी महसूल जमा केला आहे. नगररचना विभागाला यावर्षी ४४.६८ कोटीची उद्दीष्ट दिले होते. मागील वर्षी या विभागाने २१.४९ कोटी महसलू जमा केला आहे. स्थानिक संस्था कर विभागाला १४७ कोटीचे उद्दीष्ट दिले होते. यापैकी १६३.६९ कोटी महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी १७३ कोटीचे उद्दीष्ट होते. कर आकारणी व वसुली विभागाला ११४.२० कोटीचे उद्दीष्ट दिले होते. यापैकी ४६.७५ कोटी महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी ६२.२० कोटीचे उद्दीष्ट होते. इस्टेट विभागाला ३१.५२ कोटीचे उद्दीष्ट दिले होते. यापैकी ३.५४ कोटी महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी ५.३० कोटीचे उद्दीष्ट होते. परवाना विभागाला ४.१५ कोटीचे उद्दीष्ट दिले होते. यापैकी २.१४ कोटी महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी २.१९ कोटीचे उद्दीष्ट होते. आरोग्य विभागाला २.५० कोटीचे उद्दीष्ट दिले होते. यापैकी २.३४ कोटी महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी २.२४ कोटीचे उद्दीष्ट होते. शहर पाणी पुरवठा विभागाला ७३.२१ कोटीचे उद्दीष्ट दिले होते. यापैकी ४५.१९ कोटी महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी ४६.३२ कोटीचे उद्दीष्ट होते. अग्निशमन विभागाला १.२८ कोटीचे उद्दीष्ट दिले होते. यापैकी ९८.६० लाख महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी ६१ लाखाचे उद्दीष्ट होते. इतर विभागांना २८.२६ कोटीचे उद्दीष्ट दिले होते. यापैकी ६२.०४ कोटी महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी १८.९९ कोटींचे उद्दीष्ट होते. सन २०२१-२२ साली दिलेल्या ४७२.९९ कोटी महसूला पैकी ३८०.६३ कोटी महसूल जमा झाला आहे. मागील वर्षी ३०७.३३ कोटींचे उद्दीष्ट होते.

 —————————– जाहिरात——————————

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *