Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी: सराफ व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघ निवडणुकीत राजेश कुमार राठोड यांनी बाजी मारली त्यांनी प्रतिस्पर्धी माणिक जैन यांच्यावर २०२ मतांनी विजय मिळवला यामुळे सराफ संघाच्या अध्यक्षपदी राजेश कुमार राठोड तर उपाध्यक्षपदी विजय हवय यांची निवड झाली.
अध्यक्षपदासाठी राजेश कुमार राठोड यांनी सर्वाधिक ४०५ मध्ये मिळवले प्रतिस्पर्धी माणिक जैन यांना २०३ मते मिळाली उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत विजय हवा यांनी २६३ मतांनी विजय मिळवला प्रतिस्पर्धी सुहास जाधव १७३ तर अनिल पोतदार यांना १७१ मते मिळाली.
महाद्वार रोड वरील सराफ संघाच्या कार्यालयात निवडणुकीसाठी रविवारी मोठ्या चुरशीने ९० टक्के मतदान झाले होते सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात झाली प्रथम संचालक मंडळ त्यानंतर उपाध्यक्ष अध्यक्षपदाची मतमोजणी झाली या दरम्यान संपूर्ण निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला तसे हलगी पथकाच्या गजरात गुजरी परिसरात मिरवणूक काढण्यात आली.
संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत १८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.त्यापैकी कार्य करण्यासाठी निवड झालेले उमेदवार असे,किरण गांधी ४७९ ललित ओस्वाल ४६३ प्रीतम ओसवाल ४४ कुमार ४२९ अशोक कुमार ओसवाल ४२० विजयकुमार भोसले ४२१ संजय रांगोळी ४१० तेजस धडाम ३८८ भैरू ओसवाल ३७६ सिद्धार्थ परमार ३६९ शीतल पोद्दार ३५४ शिवाजी पाटील ३४०.
निवडणूक अधिकारी म्हणून कांतीलाल तथा केजी ओसवाल यांनी काम पाहिले त्यांना निवडणूक समितीचे विजय वाशिकर जवाहर गांधी बिपिन परमार सुरेश गायकवाड नंदकुमार ओसवाल कांतीलाल ओसवाल उमेश जामसांडेकर व हेमंत पावसकर या सदस्यांचे सहकार्य लाभले.
—————————-जाहिरात——————————