कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकित चुरशीने ६०.०९% मतदान…!
कोल्हापूर/ प्रतिनिधी, दि. १२:- २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी आज सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत ३५७ मतदान केंद्रावर अंदाजे एकूण ६०.०९ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली.
आज सकाळी ७ वाजल्यापासून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेस शांततेत सुरुवात झाली. सकाळी ७ ते ९ या कालावधीत ६.९६ टक्के, सकाळी ११.०० वाजेपर्यंत २०.५७ टक्के, दुपारी एक पर्यंत ३४.१८ टक्के, तर दुपारी ३.०० वाजेपर्यंत ४४.९३ टक्के, सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ५५.२६ टक्के मतदान, तर सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत एकूण अंदाजित ६०.०९ टक्के मतदान झाले आहे.

