फिट इंडियासाठी धावणे आवश्यक केएससी व रगेडियनने उपलब्ध केली संधी – उद्योजक व स्पॉनसर यांची प्रतिक्रिया
मॅरेथॉनच्या मेडल व टी शर्टचे अनावरण..

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:4 Minute, 33 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी : क्रीडा परंपरेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबर नवोदित खेळाडू घडविणाच्या उद्देशाने वायु डाइनटेक अँप प्रिझेंट्स केएससी रगेडियन कोल्हापूर रन पावर्ड बाय एस. जे.आर टायर्स कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब क्लब (केएससी) व रगेडियन क्लब यांच्या वतीने येत्या २४ एप्रिल रोजी पोलीस मैदानावर कोल्हापूर अल्ट्रा रन मॅरेथॉन होत आहे.या मॅरेथॉनच्या मेडल व टी-शर्ट चे अनावरण करण्यात आले हॉटेल २४ के येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी उद्योजक व स्पॉनसर यांची उपस्थिती होती.

फिटनेससाठी धावणे आवश्यक आहे. बिझनेसबरोबर अन्य गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे म्हणूनच “फिट इंडिया हिट इंडिया” यासाठी धावणे आवश्यक आहे म्हणूनच के एससी व रगेडियनने आयोजित केलेल्या मॅरेथॉनला आम्ही सहकार्य करत असल्याचे राजेश करंदीकर यांनी सांगितले.

स्पोर्ट्सची पहिल्यापासून आवड आहे त्यामुळेच या कोल्हापूरला होत असलेल्या अल्ट्रा रन मॅरेथॉनमध्ये आम्ही आमचा सहभाग नोंदवत आहे व यापुढेही कायमच सहकार्य आमचे असणार आहे असे नेहाल यांनी सांगितले.हिराकांत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर सर्वच गोष्टीत पुढे आहे मात्र ऑलिम्पिक सारख्या खेळात कोल्हापूर कमी पडत असल्याचे दिसते. त्यादृष्टीने अशा प्रकारच्या मॅरेथॉन खेळाडूंना उत्तेजित करण्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे संजय भोकरे यांनी सांगितले. केएससी व रगेडियन यांनी आयोजित केलेली ही अल्ट्रा रन फिटनेससाठी आवश्यक आहे असे पुढारीचे राजेंद्र मांडवकर यांनी सांगितले.यावेळी आपल्या प्रास्ताविकात रगेडियनचे आकाश कोरगावकर यांनी मॅरेथॉनचा उद्देश स्पष्ट केला.

या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक हे वायु डाइनटेक अँप व एस. जे.आर टायर हे आहेत तर दैनिक पुढारी हे स्पर्धेचे असोसिएट पार्टनर आहेत. आणि सहप्रायोजक हे

ब्लोमिंग बड्स पब्लिक स्कुल,एचपी हॉस्पिटँलिटी,इंडो काउंट इंडरस्ट्रीज लि,माख,रेमण्ड लक्झरी कॉटन,डीकॅथलॉन, स्वस्तिक कन्स्ट्रक्शन, कोल्हापूर टूरिझम, जे.के.ग्रुप,आयनॉक्स,धनश्री पब्लिसिटी आदी आहेत.तर टोमॅटो एफ. एम. रेडिओ पार्टनर आहेत आणि बी. न्युज मीडिया पार्टनर आहेत.

आता पर्यंत मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर कोल्हापूर शहरात होणाऱ्या या स्पर्धेसाठी त्वरित नाव नोंदणीसाठी रगेड कब किड्स फिटनेस अकॅडमी तावडे लॉन मेमोरियल चर्चच्या मागे सासने ग्राउंड येथे दुपारी ४ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत नावनोंदणी करावयाची आहे तर अधिक माहितीसाठी www.kolhapurrun.com या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे.आणि ७७७६९८१५४८ आणि

७७२२०६७४७७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क हा साधावयाचा आहे असे आवाहन स्पर्धा संयोजकांनी केले आहे.

या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असलेल्या स्पर्धकांसाठी प्रत्येक रविवारी प्रॅक्टिस रन व तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन आयोजित केले जात आहे. ज्याला सहभागी स्पर्धकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *