ईस्टर संडे २०२२ : हा रविवार आनंद व उत्साहाचा…!

Media Control Online : 

महाप्रभु येशु यांनी मृत्यु नंतर तीन दिवसांनी परत जन्म घेतला असल्याचे मानण्यात येते. या आनंद दिवसाच्या स्मृती प्रित्यर्थ संपूर्ण ख्रिश्नन बांधव दर वर्षी ईस्टर संडे हा सण साजरा करतात. हा सण वसंत ऋतु मध्ये येतो. वसंत ऋतुत सृष्टी सौदर्याने बहरलेली असते. ईस्टर दरवर्षी निश्चित तारखेला ने येता एकवीस मार्च नंतर पहिल्यांदा पूर्ण चंद्र दिसल्या नंतरच्या पहिल्या रविवारी ईस्टर येतो. हा शब्द जर्मनीतील ईओस्टर शब्दातून घेतला आहे.

Advertisements

महाप्रभु येशु जीवंत

याचा अर्थ आहे ‘देवी’. खिश्चन बांधवांचे श्रद्धेनुसार महाप्रभु येशु जीवंत असून महाशक्तिशाली आहे, येशु त्यांच मन आनंदीत करून त्यांच्यात उमेद व साहस जागवतात. यामुळेच त्यांना दुख: सहन करण्याची शक्ती प्राप्त होते. ईस्टर नाताळ प्रमाणे धूमधडाक्यात साजरा करण्यात येत नसला तरी ईस्टरचे वेगळे महत्व आहे. ईस्टरच्या अगोदर येणारया शुक्रवारी ख्रिश्चन बांधव ‘गुडफ्रायडे’ साजरा करतात. या दिवशी प्रभु येशु यांनी क्रुसवर लटकविण्यात आले होते. ख्रिश्चन बांधव काळे वस्त्र परिधान करून आपला शोक व्यक्त करतात.

रविवारची ही सकाळ उत्साहात आणि आनंदातआनंदाचं वातावरण घेऊन आलेली असते. अर्थात त्यामागचं निमित्तचं तसंच आहे. ईस्टर संडेच्या निमित्ताने हे उत्साही आणि आनंदी वातावरण पाहायला मिळते. ख्रिस्ती धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या ईस्टर संडेच्या निमित्ताने शनिवारी मध्यरात्रीपासून शुभेच्छांना उधाण आल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडिया म्हणू नका किंवा चर्चमधील मास म्हणू नका. प्रत्येक ठिकाणी ईस्टरचाच उत्साह पाहायला मिळतो.

येशू ख्रिस्तांकडे प्रार्थना

मुंबई महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, गोवा अशा विविध ठिकाणी असणाऱ्या चर्चमध्ये ख्रिस्त धर्मीय लोकं प्रार्थनेसाठी गर्दी करतात. ईस्टरच्या निमित्ताने ख्रिस्त धर्मीय लोकं चर्चमध्ये जात मेणबत्ती पेटवत येशू ख्रिस्तांकडे प्रार्थना करतात, त्यांच्या अस्तित्वाविषयी आभार व्यक्त करतात. आजच्या दिवशी विविध ठिकाणी ईस्टरच्या निमित्ताने काही स्नेहभोजनाच्या कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात येतं. कुटुंब, समुदाय, मित्रपरिवार यांच्या एकत्र येण्याचा असा हा ईस्टर संडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *