Share Now
Read Time:1 Minute, 20 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी ,दि. १६ : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत महविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्रीताई जाधव मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. जयश्रीताईंचा विजय हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या एकजुटीचा विजय आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विजय आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीनं जातीय, धर्मांध, प्रतिगामी शक्तींचा पराभव केला आहे. कोल्हापूरच्या विजयाने महाविकास आघाडीची जबाबदारी वाढली आहे. ती निश्चित पार पाडली जाईल. श्रीमती जयश्रीताई आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!”
Share Now