Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १६: २७६-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव यांना १९ हजार ३०७ मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आले.
विजयी उमेदवार जयश्री जाधव यांना निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक नारायण स्वामी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कापसे, संतोष कणसे, रंजना बिचकर आदी उपस्थित होते.
विजयी उमेदवार श्रीमती जाधव यांना प्रमाणपत्र देतेवेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री जाधव यांना ९७ हजार ३३२ तर भारतीय जनता पार्टी या पक्षाचे उमेदवार सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांना ७८ हजार २५ इतकी मते मिळाली.
उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते खालीलप्रमाणे-
अ.क्र. उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते
१ जाधव जयश्री चंद्रकांत (आण्णा) इंडियन नॅशनल काँग्रेस ९७३३२
२ सत्यजीत (नाना) कदम भारतीय जनता पार्टी ७८०२५
३ यशवंत कृष्णा शेळके नॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड) ३२६
४ विजय शामराव केसरकर लोकराज्य जनता पार्टी १६५
शाहीद शहाजान शेख वंचित बहुजन आघाडी ४६९
६ देसाई सुभाष वैजू अपक्ष ९८
७ बाजीराव सदाशिव नाईक अपक्ष ६६
८ भोसले भारत संभाजी अपक्ष ४३
९ मनिषा मनोहर कारंडे अपक्ष ४९
१० माने अरविंद भिवा अपक्ष ५८
११ मुस्ताक अजीज मुल्ला अपक्ष ९६
१२ मुंडे करुणा धनंजय अपक्ष १३४
१३ राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक अपक्ष ११४
१४ राजेश सदाशिव कांबळे अपक्ष १११
१५ संजय भिकाजी मागाडे अपक्ष २३३
१६ नोटा – १७९९
१७ रिजेक्टेड – ३६