Share Now
Read Time:1 Minute, 7 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी :
कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील बंदयाकरीता प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविदयालय, शाखा कोल्हापूर यांच्या वतीने साप्ताहिक राजयोग मन:शांती शिबरीराचे समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविदयालयाच्या विभागीय संचालीका सुनंदा बहेनजी यांनी मनपरिर्वतना विषयी आध्यात्मीक मार्गदशन केले. यावेळी शिबीरात सहभाग घेतलेल्या बंदयांनी मनोगते व्यक्त केली.
उपस्थित कार्यक्रमावेळी कारागृह अधिक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी बंदयांमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे सांगीतले व पुढे अध्यन निरंतर चालू ठेवण्याचे आव्हान केले.
Share Now