कोल्हापूरातील समस्त आर्कीटेक्टस्, इंजिनिअर्स व इंटिरीअर डिझाईनर्स यांच्या तर्फे आर. एस्. बेरी जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:5 Minute, 18 Second

शैलेश माने,कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील प्रथम व ख्यातनाम आर्किटेक्ट व इंजीनिअर आर. एस्. बेरी उर्फ नाना यांची जन्मशताब्दी दि. २० ऑगस्ट २०२२ ला येत आहे. कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठातील सर्व लॅबोरेटरीजच्या इमारती, ताराराणी विद्यापीठ, पद्माराजे व प्रायव्हेट हयस्कुल्, इन्कम टॅक्स ऑफिस बिल्डिंग, शाहू सभागृह (दसरा चौक), शिवाजी स्टेडियम. इत्यादी इमारतीद्वारे तसेच दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा हॉस्पिटल, कराड, मिशन हॉस्पिटल, मिरज या इमारतीद्वारे तसेच महाराष्ट्र व कर्नाटकातील इतर सर्व प्रमुख इमारतीद्वारे त्यांनी कोल्हापूरची कला परंपरा उज्ज्वल केली. या वर्षाचे निमित्त साधून कोल्हापुरातील इंडियन इंस्टीटयुट ऑफ आर्किटेक्टस्, कोल्हापूर सेंटर, असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् व इंजिनिअर्स, इंस्टीटयुट ऑफ इंडियन इंटिरीअर डिझाईनर्स, कोल्हापूर चॅप्टवर, दि इंस्टीटयुशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), कोल्हापूर लोकल सेंटर, डिपार्टमेंट ऑफ् टेक्नॉ लॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व डेक्कन इंस्टीटयुट ऑफ टेक्नॉटलॉजी, या सर्व संस्थां्नी एकत्र येउन येत्याय काही महिन्यामध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करायचे ठरवले आहे. 

 याचा प्रथम टप्पा म्हणून महाराष्ट्रातील वास्तु विशारद, आर्किटेक्चर व इंटेरियर डिझाइन कॉलेजचे विद्यार्थी, लघुपट निर्माते व कलाकार या सर्वाना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी, म्हणून चार विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. 

• वास्तुविशारदांसाठी पब्लिक बिल्डींगमधील सर्वोत्तम तयार इमारत यासाठी स्प र्धा आयोजित केली आहे. सर्व COA धारक आर्किटेक्टस्ना ही स्पर्धा खुली राहील. (संपर्क : आर्कि. विजय कोराणे) 

• इंटीरियर डिझाइनच्या तसेच आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफिस बिल्डिंग इंटिरिअर्स या स्पर्धेचे आयोजन केले आहे. (संपर्क – आय. डी. चंदन मिरजकर)

• लघूपट निर्मात्यांसाठी आर. एस्. बेरी याच्या परीसरातील कुठल्याही एका प्रोजेक्टची ३ ते ५ मिनिटांची डॉक्युमेंटरी करण्याची स्पर्धा आहे. (संपर्क – इंजि. अजय कोराणे )

• कलाकारांसाठी नानांच्या एका निवडक इमारतीचे स्केचिंग करण्यासाठी स्पर्धा घेतली जाणार आहे. (संपर्क – इंजि. प्रदीप कुलकर्णी) 

 यापैकी पहिल्या तीन स्पयर्धा दि. २५ एप्रिल २०२२ ते २५ जून २०२२ खुल्या आहेत. व चौथी स्पर्धा जुलैमध्ये घेतली जाईल. 

 या चारही स्पर्धेत भाग घेण्यासाठी कांहीही फी नाही. तथापि रु. ५० हजार ते रु. १० हजारांची विविध पारितोषिके, ट्रॉफी व सर्टीफिकेट दिली जातील. 

तसेच दि. १९ ऑगस्ट २०२२ रोजी डिपार्टमेंट ऑफ् टेक्नोलोजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, इंडियन इंस्टीटयुट ऑफ आर्किटेक्टस्, कोल्हापूर सेंटर आणि सर्व संस्था यांच्या तर्फे पूर्ण एक दिवसीय सेमिनारचे आयोजन केले आहे. (संपर्क – आर्कि. सतीशराज जगदाळे) दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी कार्यक्रमाची सांगता होईल. या सर्व स्पर्धा व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरील नमूद केलेल्या सहा संस्थांचे एकजुटीने प्रयत्न चालू आहेत. तसेच आर. एस्. बेरी यांचे दोन्ही चिरंजीव प्रमोद व शिरीष या प्रयत्नांना साथ देत आहेत. 

डेक्कन इंस्टीटयुट ऑफ टेक्नोलॉजी यासार्वांमध्ये को-ऑर्डीनेशन चा रोल करीत आहे. (संपर्क – इंजि. सुभाष कुलकर्णी) स्प्र्धा व कार्यक्रमाबद्दल विचारणा असल्यास rsbericentceleb@gmail.com या इमेल वर संपर्क साधावा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *