केआयटीमध्ये पायोनिअर, २०२२ चे २४ आणि २५ एप्रिल, २०२२ रोजी आयोजन,२००० विद्यार्थ्यांमध्ये दोन दिवस रंगणार राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा…!

0 0

Share Now

Read Time:6 Minute, 1 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी : केआयटीचे अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरमध्ये इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) स्टुडन्ट चॅप्टर अंतर्गत सालाबादप्रमाणे यावर्षीही “पायोनिअर, २०२२” या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे आयोजन २४ आणि २५ एप्रिल, २०२२ रोजी करण्यात आलेले आहे. यंदाचे हे पायोनिअर स्पर्धेचे रौप्यमहोत्सवी अर्थात २५ वे पर्व असून यामध्ये ‘अभिव्यक्ती – आंतरविद्याशाखीय शोधनिबंध स्पर्धा’ आणि ‘प्रकल्प – तांत्रिक विषयांवरील प्रकल्पांचे सादरीकरण’ या दोन स्पर्धांबरोबर प्रत्येक विभागामार्फत विविध तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २४ एप्रिल रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे सन्माननीय कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर सदरच्या कार्यक्रमास मर्सिडीज बेन्झचे जनरल मॅनेजर डॉ. उमेश देशपांडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असतील. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ‘अभिव्यक्ती’ व ‘प्रकल्प’ या मुख्य स्पर्धा पार पडतील. अभिव्यक्ती या स्पर्धेत स्पर्धक विद्यार्थी हे निरनिराळ्या आंतरविद्याशाखीय विषयांवरील त्यांचे शोधनिबंध हे विविध क्षेत्रांशीसंबंधित नवकल्पना, संशोधन, उपयुक्तता आणि आव्हाने यांच्या माध्यमातून सादर करतील. तसेच प्रकल्प या स्पर्धेत एकूण ५ गटात विभागवार स्पर्धक विद्यार्थी हे त्यांनी केलेल्या तांत्रिक विषयांवरील प्रकल्प वर्किंग मॉडेल्स, पोस्टर्स आणि प्रात्यक्षिकांचा माध्यमातून सादर करतील.

दि. २५ एप्रिल रोजी बायोटेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग विभागाकडून ‘शार्क टॅंक – स्टार्टअप अँड बिजनेस आयडिया’, सिव्हिल अँड एन्व्हायरन्मेंटल इंजिनीअरिंग विभागाकडून ‘इन्व्हिजन – क्वीज अँड टेक्निकल प्रेजेंटेशन’, सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाकडून ‘निर्मिती – टेक्निकल डॉक्युमेंटरी’, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाकडून ‘डाइव्ह इन सर्किट – बिल्ड द सर्किट’, कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागाकडून ‘मल्टीवर्स ऑफ कोडींग – कोडिंग अँड प्रोग्रॅमिंग’, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाकडून ‘बिग आयडिया – प्रेजेंटेशन अँड आयडिया पिचिंग’ आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाकडून ‘कॅडवेंजर्स – क्वीज अँड इंजिनीअरिंग ड्रॉईंग’ अश्या एकूण ७ प्रकारच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. 

या स्पर्धेच्या समारोप व पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इन्फोसाईट कन्सल्टिंग, बेंगळुरूचे उपाध्यक्ष – क्लायंट सर्व्हिसेस श्री. मनोज बी. एम. हे उपस्थित असतील. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा, तामिळनाडू व इतर राज्यातील सुमारे २००० विद्यार्थी सहभागी होत असून एकूण १,५०,००० रुपयांची रोख बक्षिसे, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत.

या सर्व स्पर्धांसाठीची नोंदणी प्रक्रिया चालू असून डिग्री आणि डिप्लोमा इंजिनीअरिंगचे अनेक विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयएसटीई स्टुडंट चॅप्टरचे विद्यार्थी अध्यक्ष सारस गायकवाड व इतर विद्यार्थी सदस्य, आयएसटीई फॅकल्टी ऍडव्हायजर प्रा. अभिजित पाटील, पायोनियरचे समन्वयक डॉ. जितेंद्र भाट, विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ. अक्षय थोरवत तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी हे गेले दोन महिने परिश्रम घेत आहेत. तसेच सदरच्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये केआयटीचे अध्यक्ष श्री. सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री. साजिद हुदली, सचिव श्री दिपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जींन्नी व संचालक डॉ. मनोज मुजुमदार या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. अधिक माहितीसाठी केआयटी च्या संकेतस्थळावर (www.kitcoek.in) भेट द्या.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *