Kolhapur : स्केटिंगमध्ये मंदार जितेंद्र यशवंत ठरला जगात भारी!

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – स्केटिंगसारख्या क्रीडा प्रकारात आपली चमकदार कामगिरी दाखवत गडमुडशिंगी येथील मंदार जितेंद्र यशवंत याने अनेक रोकॉर्ड आपल्या नावावर करून कोल्हापूरचे नाव जगात पोहोचविले आहे. त्यामुळे स्केटिंगमध्ये मंदार जितेंद्र यशवंत जगात भारी ठरला असून याबाबत त्याचे अनेकांककडून कौतुक होत आहे.

बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग अकॅडमी आणि ट्रिनिटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत झालेल्या ‘मोस्ट स्केटर परफॉर्मिंग ९६ हॉव्हर्स फॉर परमोटिंग एक भारत श्रेष्ठ भारत’ हा रेकॉर्ड घेण्यात आला.

यामध्ये एस. के. रोलर स्केटिंग अकॅडमीचा खेळाडू मंदार जितेंद्र यशवंत याने या विश्वविक्रमात चार दिवसात 96 तासानंतर 11703 फेऱ्या दोनशे मीटरच्या ट्रॅकवर पूर्ण करून इंडिया अचिव्हर बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया पॅसिफिक रेकॉर्ड, ग्लोबल रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, नॅशनल रेकॉर्ड,चिल्ड्रन रेकॉर्ड अशा एकूण आठ बुकमध्ये विश्वविक्रमामध्ये नोंद केली आहे.

त्याला प्रशिक्षक म्हणून भूपाल शेटे, जितेंद्र यशवंत ग्रामपंचायत सदस्य गडमुडशिंगी यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *