वनविभाग नूतन कार्यालय उद्घाटन आणि जंगल सफारी च्या नवीन वाहनांचा लोकार्पण समारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी ‘: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व आपण साजरे करीत आहोत. यानिमित्ताने वन विभागाच्या अत्यंत देखण्या आणि आकर्षक अशा नवीन वास्तूचे उद्घाटन आणि जंगल सफारीसाठी नवीन वातानुकुलित असणारी बस आणि २ नवीन कॅम्पर बोलेरो गाड्या यांचे लोकार्पण उद्या दिनांक २२एप्रिल रोजी विचारे माळ सदर बाजार येथे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी डी पाटीलसो यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत होत आहे.  

‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज’ आणि पर्यटन हा जणू कोल्हापूरचा श्वासच आहे असं म्हणावं लागेल. राधानगरी धरण आणि दाजीपूर अभयारण्य यांनी कोल्हापूरच्या पर्यटनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. कोल्हापुरातील व्यवसाय चालण्यासाठी पर्यटन अधिक प्रगतीशील होणे गरजेचे आहे हे ओळखून शाहू महाराजांनी येथील ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या विविध वास्तूंचे संवर्धन करण्याचे धोरण अवलंबले. राजर्षी शाहू महाराजांनी दाखवलेल्या याच वाटेवरील पुढील प्रवास म्हणजेच कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्यामार्फत पर्यटन वृद्धीसाठी केले जाणारे विविध उपक्रम होय. कोल्हापूर टुरिझम सारखे उपक्रम सध्या कोल्हापुरातील विविध पर्यटन स्थळे यांचे संवर्धन करून त्यायोगे कोल्हापूरच्या विविध कला वस्तू यांच्या व्यवसाय वाढीस पाठबळ देत आहेत. कोल्हापूर हून निघणाऱ्या या जंगल सफारी मध्ये राधानगरी धरण, देवराई ,दाजीपूर जंगल सफारी, राऊतवाडी धबधबा आणि बरीच ठिकाणे यामध्ये पाहता येतील. सोबत चहा नाश्ता ची सोय सुद्धा करण्यात येणार आहे तेही फक्त ४०० रुपये मध्ये. 

Advertisements

[  ] कार्यक्रमाचे स्थळ:-  वन विभाग कार्यालय, विचारे माळ, सदर बाजार कोल्हापूर

[  ] कार्यक्रमाची वेळ:-  २२ एप्रिल २०२२.

[  ]  सकाळी ९:३० वाजता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *