विशेष वृत्त अजय शिंगे
कोल्हापूर प्रतिनिधी,दि.२२ : महाराष्ट्र हायस्कूल च्या माजी विद्यार्थिनी मिळून समाजसेवेसाठी व समाजातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चैतन्य स्पर्श फ़ाउंडेशनची स्थापना तीन वर्ष पूर्वी केली.गेल्या तीन वर्ष पासून चैतन्य स्पर्श फ़ाउंडेशन कडून समाजासाठी विविध उपक्रम राबविले गेले.
कोल्हापूर मधील महापूर मध्ये अडकलेल्या लोकांना औषध असतील त्यांना लागणाऱ्या घर उपयोगी वस्तू असतील , वेगवेगळ्या शाळेत मेडिकल कॅम्प आयोजित करणे असेल,स्मशानभूमी साठी शेणी दान राह्वाशी शाळे मध्ये लागणारी अन्न सामग्री असेल,तसेच विविध प्रकारच्या गरजू लोकांना योग्य ती मदत अशा प्रकारच्या अनेक सेवा चैतन्य स्पर्श फ़ाउंडेशन कडून देण्यात गेल्या तीन वर्षात देण्यात आल्या आहेत.
कोरोना सारख्या महामारी नंतर बऱ्याच कुटुंबाची आर्थिक घडी खालावली आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन चैतन्य स्पर्श फ़ाउंडेशनने भव्य हिंदू धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करायचे ठरविले. हा सोहळा दि.२२-०५-२०२२ रोजी दुपारी १२.२५ वाजता , गंगाई लॉन फुलेवाडी ,कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.
या विवाह सोहळ्य साठी समाजातील गरजू लोकांनी आजच आमच्या कडे नोंदणी करावी अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष यांनी पत्रकार परिषद मध्ये केली.