महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमीचा कोल्हापूर मध्ये शुभारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२२  :  महाराष्ट्रातील दुसरी व पश्चिम महाराष्ट्रातील पहिली महेंद्रसिंग धोनी अॅकॅडमी कोल्हापूरमधील अत्यंत जुन्या व क्रिकेट परंपरा असणाऱ्या शाहूपुरी जिमखाना येथे चालू करताना आम्हाला आनंद होत आहे. महेंद्रसिंग धोनी यांचे खेड्यातून शहराकडे अशारितीने प्रवास करताना महाराष्ट्रामध्ये ही दुसरी अॅकॅडमी कोल्हापूरमध्ये आपल्या साक्षीने चालू करताना ग्रामीण विभागात जास्तीत जास्त क्रिकेटचे आधुनिक पध्दतीचे क्रिकेट प्रशिक्षण देण्याचा आमचा मानस आहे. यामधून जास्तीत जास्त खेळाडू राज्य व देश पातळीवर खेळावेत ही संकल्पना आहे.

 देशामध्ये क्रिकेट खेळाडूंना क्रिकेटचे अद्यावत व तंत्रशुध्द पध्दतीने प्रशिक्षण मिळावे व ग्रामीण भागातील टॅलेंटेड क्रिकेट खेळाडू राज्य व देशामध्ये चमकावेत यासाठी महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमीचा सुरुवात आरका स्पोर्टस् कंपनीने देशामध्ये सुरुवात केली. याच आरका स्पोर्टस् कंपनी बरोबर महाराष्ट्रामध्ये याच पध्दतीने क्रिकेट अकॅडमी सुरु व्हावी म्हणून पुण्याच्या क्रिकेट मास्टर्स अकॅडमीने  करार केला आहे. शाहूपुरी जिमखाना व चाटे शिक्षण समुहाने कोल्हापूर मध्ये महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमीची  सुरुवात व्हावी यासाठी क्रिकेट मास्टर्स अकॅडमीचा पुणे यांचे बरोबर करार करुन त्याची सुरुवात २४ एप्रिल पासून करीत आहोत. ही अकॅडमी महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आणण्याबाबत विचार करताना मुख्यत: पुढील गोष्टींचा विचार करुन ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे.

Advertisements

१) महेंद्रसिंग धोनीचे क्रिकेट वाढीबाबत विचार

२) मुख्यत: शहराबरोबर ग्रामीण भागात प्रसार करण्याचा मुख्य उद्देश व ग्रामीण भागातील क्रिकेट टॅलेंट राज्य व देश पातळीवर पाठविणे. अकॅडमी वर्षभर सुरु ठेवण्याचा मानस आहे. पावसाळ्यात देखील इनडोअर सुविधा निर्माण करुन वर्षभर क्रिकेट कोचींग सुरु राहणार.

३) अकॅडमी मध्ये  १०, १२, १४, १६, १९, सिनियर अशा वयाच्या गटामध्ये विभागणी करुन सराव शिबिरे असणार आहेत. त्याचबरोबर त्या त्या वयोगटात जास्तीत जास्त सामन्याचा अनुभवासाठी स्पर्धा चालविण्याबाबत नियोजन करणार आहोत.

४) संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोप्या भाषेमध्ये व एकसंघ कोचिंगचे नियोजन करताना प्रत्येक गटामध्ये जास्तीत जास्त २० खेळाडूंचा समावेश असणार आहे.

५) कोचिंगचा दर्जा उच्च प्रकारचा ठेवण्यासाठी अकॅडमीचा मुख्य कोच हा रणजी ट्रॉफी व लेव्हल ३ चा कोच असणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक गटाला सहाय्यक कोच हा लेव्हल १ चा असणार आहे.

६) कोचिंग बरोबर पालकांशी संवाद, खेळाडूंच्या फिटनेसवर व आहार विषयक मार्गदर्शन तज्ज्ञांकडून देणार आहोत.

 या गोष्टींचा समावेश असल्यामुळे वर्षभर सरावाबरोबर सामन्याचा अनुभव देणार आहोत. त्यामुळे खेळाडू सर्व सामने खेळण्यासाठी व त्याच्या क्रिकेट कारकिर्दिसाठी तयार होणार आहे.

 यामधून मुख्य म्हणजे इनडोअर अकॅडमी तयार करुन मुलांना वर्षभराची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. महाराष्ट्रासाठी, पुढे देशातील इतर स्पर्धेसाठी मुलांना या शिबिरांचा फायदा होईल व शिवाय आम्ही आमच्या करारामध्ये आपल्या सिनियर खेळाडूंना त्यांचे क्रिकेट संपल्यावर कोचिंग, अंपायरिंग, फिजिकल ट्रेनर इतर प्रकारामध्ये नोकरी मिळण्याबाबत प्राधान्य देण्याबाबत करार केला असल्यामुळे लेव्हल १ ची परीक्षा सुविधा देताना (नाममात्र फी भरुन) नोकरीची हमी देण्याबाबत विचार केलेला आहे.

 महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ रविवार दिनांक २४  एप्रिल २०२४  रोजी सकाळी ९ वाजता भारताचा माजी कसोटीपट्टू, भारताचे माजी वेगवान गोलदांज व मुंबई रणजी ट्रॉफी निवड समितीचे अध्यक्ष सलिल अंकोला यांचे शुभहस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार संजय मंडलिक भुषविणार आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चेतन चौगुले, माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, चाटे शिक्षण समुहाचे भरत खराटे, माजी रणजीपट्टू शैलेश भोसले,अॅड कमल सावंत MCA कमिटीचे सदस्य, अभिषेक बोके सिनेट सदस्य पुणे विद्यापीठ यांचे प्रमुख उपस्थितीत होत आहे.

 पत्रकार परिषदेला क्रिकेट मास्टर्स अकॅडमी पुणे चे अनिल वाल्हेकर, अमोल माने, शाहुपुरी जिमखान्याचे अध्यक्ष विनोद कांबोज, रमेश पुरेकर, संजय शेटे,चाटे शिक्षण समुहाचे भरत खराटे, धवल पुसाळकर,विजय भोसले,केतन शहा, शीतल मिठरी, दिवाकर पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *