Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी,२२ : महानगरपालिका क्षेत्रातील दाखल झालेल्या विकास परवानगी (इमारत बांधकाम व भोगवटा) कामी मंगळवार दि.२६ व २७ एप्रिल २०२२ रोजी नगररचना विभागामार्फत दोन दिवसाचे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या सुचनेनुसार या दोन दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हा विशेष कॅम्प घेतला जाणार आहे.
या कॅम्पमध्ये विविध प्रकारचे विकास परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम परत, ले आऊट मंजूरी, एकत्रीकरण व विभाजनची कामे केली जाणार आहेत. तरी संबंधीतांनी सदरच्या कॅम्पमध्ये सहभागी होणेकरीता दि.२६ व २७ एप्रिल २०२२ रोजी नगररचना विभाग, दुसरा मजला, बागल मार्केट, राजारामपुरी येथे आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून संबधीतांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन नगररचना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे