महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४ : कोल्हापूरकरांच्या नसानसात जिद्द, कष्ट आणि चिकाटी हे गुण ठासून भरलेले आहेत. खेळाडू घडवण्यासाठी हे गुण निश्चितच महत्त्वाचे ठरतात. आशा खेळाडूंना एम.एस.धोनी क्रिकेट ॲकॅडमीच्या माध्यमातून तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार आहे.त्यामुळ इथले खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करतील असा विश्वास भारतीय संघाचा माजी कसोटीपटू सलील अंकोला यांनी व्यक्त केला. धोनी अॅकॅडमीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि उत्कृष्ट फिनिशर अशी ख्याती असलेला एम.एस.धोनी यांन देशातील टॅलेंटला वाव देण्यासाठी क्रिकेट अकॅडमीची स्थापना केली आहे. या अॅकॅडमीची महाराष्ट्रातील दुसरी तर पश्चिम महाराष्ट्रातील पहिली शाखा कोल्हापुरातील शाहूपुरी जिमखाना इथ सुरु होतीय. या शाखेच्या उद्घाटन समारंभाच आज आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय संघाचा माजी कसोटी क्रिकेटपटू ,अभिनेता सलील अंकोला, खासदार संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा विनोद कंबोज, रमेश पुरेकर, संजय शेटे, चेतन चौगुले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शतक महोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या शाहुपुरी जिमखान्याला नव्यानं खेळाडू घडविण्यासाठी एम.एस.धोनी अकॅडमीच्या माध्यमातून एक नवी ओळख निर्माण होणार असल्याचं विनोद कांबोज यांनी सांगितलं. १० ते १९ या वयोगटासोबतच सीनियर गटातील दर्जेदार क्रिकेटपटू घडवणं, त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळण्यास प्रोत्साहित करणं हे धोनी अकॅडमीच ध्येय असल्याचं आणि त्यासाठी अविरत परिश्रम सुरू असल्याचं या अकॅडमीचे महाराष्ट्रातील प्रमुख अनिल वाल्हेकर यांनी सांगितलं. शास्त्रोक्त पद्धतीन खेळाडू घडवणं, त्या दृष्टीनं अकॅडमी चालवण्याच ध्येय घेऊन उतरलेली ही अकॅडमी कोल्हापूरच्या क्रिकेटला निश्चितच उभारी देणारी ठरेल असा विश्वास जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी व्यक्त केला.

Advertisements

खेळाडूंच्या अंगी योग्य गुण निर्माण करून दर्जेदार राष्ट्रीय खेळाडू घडवण्याच ध्येय एम.एस.धोनी अकॅडमी आणि चाटे शिक्षण संस्थेच असल्याचं प्रा.भारत खराटे यांनी सांगितलं. कोल्हापूर हा लढवय्यांच्या जिल्हा आहे. क्रिकेटच्या माध्यमातूनही इथं मोठ्या प्रमाणात ताराराणी तयार होतील असा विश्वास एमसीएच्या सदस्या अॅड. कमल सावंत यांनी व्यक्त केला. अभिषेक बोके, माजी क्रिकेटपटू श्याम ओक यांनीही मनोगत व्यक्त केली. आठ वर्ष अपयशी ठरलेला मुंबईच्या रणजी संघाला पात्र बनवण्यासाठी आपण परिश्रम घेतलेत. ग्रेट क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचा विश्वास सार्थ ठरवत निवड समितीच पद मिळाल्यानंतर आपण महाराष्ट्राच्या संघाला क्वालिफाईड करू शकलो. कोल्हापूर ही कुस्ती पंढरी आहे. त्यामुळे इथं जिद्द, कष्ट, चिकाटी हे गुण दिसून येतात. इथं क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळल जात. खेळाडूंची खाण असलेल्या या नगरीत एम.एस.धोनी अकॅडमी निश्चितच यशस्वी होईल असा विश्वास माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांनी व्यक्त केला. पुढील वर्षी बीसीसीआयच्या पुढाकारनं महिलांसाठी आयपीएल सामने, तसच दिव्यांगांसाठीही स्पर्धा होणार असल्याच त्यांनी सांगितलं. या जिल्ह्यात गुणवंत खेळाडू घडलेत. तसंच शाहूपुरी जिमखान्यानंही दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्न केलेत. या परंपरेत एम.एस.धोनी अकॅडमी निश्चितच भर घालेल. देशपातळीवरचे दर्जेदार खेळाडू घडतील असा विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला. शाहूपुरी जिमखाना मैदान सुसज्ज करण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याच त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर मान्यवरांच्या हस्ते धोनी क्रिकेट अकॅडमीच्या फलकाच अनावरण करण्यात आलं. तसंच मैदानावर श्रीफळ वाढवून या अकॅडमीचा उद्घाटन झाल्याचं जाहीर करण्यात आल. यावेळी जिमखान्याचे माजी संचालक श्री कुलभूषण टिक्के, संचालक विजय भोसले अभिजित कापसे, राजेंद्र मिठारी, केतन शाह, शीतल मिठारी, दिवाकर पाटील,अंकुश निपाणीकर तसेच खेळाडू,आणि पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *