Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त गुणीदास फाऊंडेशन, शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग, आणि गायन समाज देवल क्लब यांच्यावतीने आज संगीत दरबार शास्त्रीय गायन, सुगम/ नाट्य गायन, वाद्य संगीत कार्यक्रमाचे भवानी मंडप जुना राजवाडा याn ठिकाणी आयोजन करण्यात आले होते .
प्रारंभी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण व सौ . चव्हाण यांच्या हस्ते छ . शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला .आयोजकांनी कोल्हापूरातील जनतेला कानसेन होण्याची संधी दिल्याबद्दल श्री चव्हाण यांनी आयोजकांना धन्यवाद दिले .
शाहू महाराजांचे केवळ समाजसुधारणा व शिक्षण या क्षेत्रात योगदान आहे असे नाही, तर नाट्य, गायन आदी कलांना उदार राजाश्रय देऊन त्यांनी कोल्हापूरचे नाव सर्व हिंदुस्थानात मोठे केले . त्यांच्या कारकिर्दीत विविध कला क्षेत्रात एक सुवर्ण युग अवतरले.
आज पार पडलेल्या या संगीत दरबारात प्रारंभी सावनी शिखरे यांनी खयाल गायन सादर केले तर आशय कुलकर्णी ( तबला ) स्वानंद जाधव ( अॅक्टोपॅड ) तर पियानो वर सावनी धर्माधिकारी यांनी संगीतकार मदनमोहन यांची ‘ लग जा गले ‘ ही रचना सादर केली तर मन आणि कान तृप्त करणारे सितारवादन वरद भोसले यांनी केले . श्री भोसले यांनी यावेळी आपल्या सतारीद्वारे राग बागेश्री व पिलू राग सादर केला .
उत्तरोउत्तर रंगत जाणाऱ्या या कानसेन महोत्सवात खरी बहार आणली ती , पं . विनोद दिग्रजकर , डॉ .शितल धर्माधिकारी व श्रीमती स्मिता घोसरवाडकर यांच्या भावगीत , नाटयगीत , अभंग आणि भक्ती गीतांनी .रसिकांना सांस्कृतिक मेजवानीद्वारे तृप्त करणारा हा कार्यक्रम लवकर संपवूच नये अशी भावना येथील खऱ्या दर्दी रसिकाची झाली होती .
या कार्यक्रमासाठी गुणीदास फाऊंडेशनचे डॉ . अजित शुक्ला ,राजप्रसाद धर्माधिकारी , शिवाजी विद्यापीठाचे डॉ . विनोद ठाकूर – देसाई व गायन समाज देवल क्लबचे श्रीकांत दिग्रजकर, सचिन पुरोहित, अभय देशपांडे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते .