महापालिकेच्यावतीने शहरातील चार हॉस्पीटलच्या बंदिस्त पार्किंगवर कारवाई…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.२५ : राजारामपुरी परिसरातील काही हॉस्पीटलच्या पार्किंगमध्ये बांधकामे करुन पार्किंग बंदीस्त केलेली आहेत. यापार्किंगमध्ये वाहनांचे पार्किंग न झाल्याने मोठया प्रमाणात रस्त्यावर पार्किंग होत होते. त्यामुळे रहदारीस अडथळे निर्माण होत होता. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी येत होत्या.

प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी गुरुवार, दि.२१ एप्रिल २०२२ रोजी राजारामपूरी येथील नगररचना विभागामध्ये नागरीकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यामध्ये राजारामपुरी येथील काही हॉस्पीटलचे इमारतीमध्ये पार्किंग न करता अनाधिकृत पार्किंग बंदिस्त करुन वापर केला जात असलेच्या तक्रारी आल्या होत्या. सदरचे पार्किंग खुली करुन रस्त्यावर होणारे पार्किंग बंद होणेचे दृष्टीने प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी नगररचना विभागाला सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सोमवार दि.२५ एप्रिल २०२२ रोजी राजारामपूरी येथील वाघाडीया हॉस्पीटल, कोल्हापूर मेटर्निटी हॉस्पीटल, व्हाईट लाईन हॉस्पीटल, गुरुप्रसाद हॉस्पीटल या चार हॉस्पीटलवर कारवाई करण्यात आली. यामध्ये हॉस्पीटलचे बंदिस्त पार्किंग निष्काशित करण्यात आली.

Advertisements

सदरची कारवाई प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे व शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हि कारवाई उपशहर रचनाकार हर्षजीत घाटगे, रमेश मस्कर, उपशहर अभियंता नारायण भोसले, बाबुराव दबडे व नगररचना विभाग, विभागीय कार्यालय क्रं.३,४ च्यावतीने करण्यात आली.

मंगळवार, दि.२६ व बुधवार २७ एप्रिल २०२२ रोजी नगररचना विभागामध्ये विकास परवाना बाबत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सदरची मोहिम दोन दिवसाचा कॅम्प झालेनंतर पुन्हां सुरु करण्यात येणार आहे. तरी शहरातील ज्या इमारत धारकांनी पार्किंग बंदिस्त करुन अनाधिकृत वापर करत आहेत ते बंद करुन रस्त्यावरील होणारी पार्किंग सुरळित करावी अन्यथा पार्किंग निष्काशित करण्याची कारवाई केली जाईल असे आवाहन नगररचना विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *