Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष प्रतिनिधी शैलेश माने
कोल्हापूर/प्रतिनिधी :“आजची पिढी प्रचंड स्मार्ट आहे, या स्मार्टपिढीने स्वतःच्या वेळेचे स्मार्ट नियोजन करावे आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्वतःची, समाजाची आणि देशाची प्रगती करावी असे मत मर्सिडीज बेन्झचे जनरल मॅनेजर डॉ. उमेश देशपांडे यांनी व्यक्त केले ते केआयटीचे अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालय, कोल्हापूरमध्ये इंडियन सोसायटी ) फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) स्टुडन्ट चॅप्टर अंतर्गत आयोजित “पायोनिअर २०२२” या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे सन्माननीय कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केआयटीचे अध्यक्ष श्री. सुनील कुलकर्णी होते.
आपल्या मनोगतात देशपांडे यांनी त्यांच्या करिअरच्या आणि महाविद्यालयीन आयुष्यातील आठवणी सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आयुष्यामध्ये काम आणि व्यक्तिगत आयुष्य यांचा समतोल साधत जगण्याचा आनंद शोधा,ध्येयवादी बना, उत्साही रहा आणि महाविद्यालयीन आयुष्याचा आनंद लुटा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितलेला YES आणि NO शब्दांचाअर्थ विद्यार्थ्यांना भावला. समाधान आणि आनंद आयुष्यात विकत मिळत नाही त्यामुळे छोट्यागोष्टींमधून हा आनंद शोधा तुमचे खाजगी आणि व्यावसायिक आयुष्य छान होईल असे त्यांनीसांगितले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ शिर्केयांनी विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्व सांगून अधिकाधिक वाचन करण्याचा सल्ला दिला.त्यांच्या मनोगतात त्यांनी देशातील इनोव्हेशन साठो सन्मानित व्यक्तींच्या कामाचा आणिअनुभवाचा अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यांच्या मनोगतात त्यांनी कला प्रदर्शनातील कलाकारांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात सुनील कुलकर्णी यांनी केआयटीची सामाजिक आणि संशोधनाची सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत करणार असल्याचे सांगितले,तसेच संशोधक विद्यार्थ्यांना २० लाख रुपयांपर्यंतची संशोधक निधी देणार असल्याचे सांगितले. यावेळी १२ उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या सीईटी तयारीसाठी केआयटीच्या वतीने तयारकरण्यात आलेल्या ‘KITCET’ या ऍप्लिकेशनचे उदघाटन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जींन्नीयांनी पाहुण्यांचे स्वागत केले, समन्वयक डॉ. जितेंद्र भाट यांनी प्रास्ताविक केले,आयएसटीई विद्यार्थी प्रमुख सारस गायकवाड याने आभार मानले.आयएसटीई फॅकल्टी ऍडव्हायजरप्रा. अभिजित पाटील, पायोनियरचे समन्वयक डॉ. जितेंद्र भाट, विद्यार्थी उपक्रमअधिष्ठाता डॉ. अक्षय थोरवत केआयटीचे अध्यक्ष श्री. सुनील कुलकर्णी, सचिव श्री दिपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जींन्नी व संचालक डॉ. मनोज मुजुमदार हेउपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दानिश व निधी पाटील यांनी केले. यंदाचे हे पायोनिअर स्पर्धेचे रौप्यमहोत्सवी अर्थात २५ वे पर्व असून यामध्ये ‘अभिव्यक्ती -आंतरविद्याशाखीय शोधनिबंध स्पर्धा’ आणि ‘प्रकल्प – तांत्रिक विषयांवरीलप्रकल्पांचे सादरीकरण’ या दोन स्पर्धांबरोबर प्रत्येक विभागामार्फत विविध तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.दि. २५ एप्रिल रोजी बायोटेक्नॉलॉजी इंजिनीअरिंग विभागाकडून ‘शार्क टॅंक – स्टार्टअपअँडबिजनेस आयडिया’, सिव्हिल अँड एन्व्हायरन्मेंटल इंजिनीअरिंग विभागाकडून ‘इन्व्हिजन -क्वीज अँड टेक्निकल प्रेजेंटेशन’, सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाकडून ‘निर्मिती – टेक्निकल डॉक्युमेंटरी’, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगविभागाकडून ‘डाइव्ह इन सर्किट – बिल्ड द सर्किट’, कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंगविभागाकडून ‘मल्टीवर्स ऑफ कोडींग -कोडिंग अँड प्रोग्रॅमिंग’, इलेक्ट्रॉनिक्स अँडटेलीकम्युनिकेशन विभागाकडून ‘बिग आयडिया – प्रेजेंटेशन अँड आयडिया पिचिंग’आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाकडून ‘कॅडवेंजर्स – क्वीज अँड इंजिनीअरिंग ड्रॉईंग’ अश्याएकूण ७ प्रकारच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
या स्पर्धेच्या समारोप व पारितोषिकवितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इन्फोसाईट कन्सल्टिंग, बेंगळुरूचे उपाध्यक्ष –क्लायंटसर्व्हिसेस श्री. मनोज बी. एम. हे उपस्थित असतील. एकूण १,५०,००० रुपयांची रोख बक्षिसे, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत.