स्वरांनी बहरली शाहू मिल; श्रोते मंत्रमुग्ध…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल येथे आयोजित संगीत दरबारात शास्त्रीय गायन, सुमन संगीत, नाट्य गायन व वाद्य संगीताच्या स्वरांनी शाहू मिल बहरली.. गायनाचा अस्वाद घेताना श्रोते मंत्रमंग्ध झाले.. शाहू मिल परिसरात या गायनाचा नाद घुमला.. निमित्त होते, संगीत स्वरांजली कार्यक्रमाचे..!

लोकराजाच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभाग, गुणीदास फाउंडेशन आणि गायन समाज देवल क्लब यांच्यावतीने शाहू मिल येथे ‘स्वरांजली लोकराजाला’ हा संगीत दरबार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मृणालिनी परुळेकर यांच्या व्हायोलिन वादनाने झाली. कार्यक्रमात गुरुनाथ ढोले, प्रदिप जिरगे, भूषण साठम, ऋतिक साठम यांनी वाद्यवृंद, गौतमी चिपळूणकर आणि पं.विनोद डिग्रजकर यांनी शास्त्रीय गायन, डॉ. भाग्यश्री मुळ्ये, महेश हिरेमठ, शुभांगी जोशी, करण कागले यांनी सुगम संगीत सादर केले. गिरीधर कुलकर्णी व अतुल ताडे यांनी तबला साथ, अभिषेक पुरोहित, स्वरुप दिवाण यांनी हार्मोनियमची साथ तर मंगेश सारंग यांनी कीबोर्ड साथ दिली. या मान्यवरांनी आपल्या कलेतून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहिली.

Advertisements

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व कलांना राजाश्रय दिल्यामुळेच कोल्हापूर हे ‘कलेचे माहेरघर’ बनले. त्यामुळेच कोल्हापूरची कलापूर म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाल्याचे दिसून येते.संगीत दरबार कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रीय गायक विनोद डिग्रजकर, शिवाजी विद्यापीठाचे विनोद ठाकूर-देसाई, निखील भगत, गुणीदास फाउंडेशनचे राजप्रसाद धर्माधिकारी व शिरीष सप्रे, देवल क्लबचे दिलीप गुणे,श्रीकांत डिग्रजकर,सचिन पुरोहित यांच्या हस्ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *