विशेष वृत्त:अजय शिंगे
कोल्हापूर/प्रतिनिधी : डॉ .डी. वाय. पाटील ग्रुप आणि पाटाकडील तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने, कै.पांडबा जाधव, कै.रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचे आज छत्रपती शाहू स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले.
आज सकाळी झालेल्या सामन्यात फुलेवाडी संघाने बी जी एम संघावर ट्रायब्रेकर वर विजय संपादन करून पुढील फेरीत प्रवेश मिळवला. संपुर्ण वेळेत सामना १-१ बरोबरीत राहिल्याने. सामन्याचा निकाल ट्रायब्रेकर वर घेण्यात आला या मध्ये,फुलेवाडी ने ५-४ अशा फरकाने विजय मिळवला.
दुपारच्या सत्रात ऋणमुक्तेश्वर विरूद्ध बालगोपाल तालीम यांच्यात झालेल्या सामन्यात बालगोपाल ने ३-२ अशा गोल फरकाने विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला.
उद्धघाटनाचा सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पाटाकडील ने वाघाच्या तालमीचा ८ विरूद्ध १ अशा गोल फरकाने धुव्वा उडविला.सामन्यात ऋषीकेश मेथे ने वयक्तिक ६ गोल करत स्पर्धेतील पाहिल्या डबल हॅट्ट्रिक ची नोंद केली
उद्धघाटन प्रसंगी मा. आमदार ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, मधुरिमाराजे छत्रपती, डॉ. भरत कोटकर, पाटाकडील तालमीचे एस. वाय सरनाईक, शरद माळी, संपत जाधव, संदीप सरनाईक, श्रीनिवास जाधव, दीपक चोरगे तसेच फुटबॉल प्रेमी उपस्थित होते.