कोल्हापूर/प्रतिनिधी : ६ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना १०० सेकंद आदरांजली वाहण्यात येणार आहे. दि न्यू एज्यूकेशन संस्थेमार्फत विविध ठिकाणी जागृती
पथनाट्य सादर करण्यात येणार असून या पथनाट्याचा शुभारंभ पालकमंत्री सतेज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शाहू मिल येथे करण्यात आला. १०० सेकंद लोकराजासाठी, १०० सेकंद कृतज्ञतेचे हा आशय घेऊन पथनाट्य सादर केले जाणार आहे.
Advertisements

