मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापुरात….!

कोल्हापूर/प्रतिनिधी

राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वातील आदरांजली सभे साठी उद्या दि.६मे रोजी सकाळी १०:३० वाजता मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर मध्ये येत आहेत.शाहू मिल येथे आदरांजली सभा होणार आहे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,यांच्या सह राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

Advertisements

उद्या शुक्रवारी ६ मे रोजी राजश्री शाहू महाराज यांची स्मृति शताब्दी साजरी होत आहे.त्यामध्ये शाहू प्रेमी आणि जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन महविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

 पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून व कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्या तर्फे वर्ष भर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यातील एक भाग म्हणजे उद्या सकाळी १० वाजता १०० सेकंद आदरांजली वाहण्यासाठी आहे त्या ठिकाणी सर्वांनी स्तब्ध राहून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना आदरांजली देऊ.

 सभे साठी उपस्थित राहण्याचे आवाहन माहविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *