शाहुपुरी पोलिस ठाण्याची मोठी कामगिरी सायकल चोरी व घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:6 Minute, 3 Second

विशेष वृत्त क्राईम रिपोर्टर : जावेद देवडी 

शाहुपूरी पोलीस ठाणे मध्यवर्ती व शाहुपूरी परीसरात गेल्या काही दिवसा पासुन मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा तपास करणे बाबत मा. पोलीस अधिक्षक सो कोल्हापूर यांनी सुचना दिल्या होत्या त्या प्रमाणे शाहुपूरी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथक मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघकीस आणणे करीता प्रयत्न करीत होते.दिनांक ४-५-२०२२ रोजी गुन्हे शोध पथकास एक इमस चोरीची ॲक्टिवा मोपेड मोटर सायकल घेवुन मध्यवर्ती बसस्थानक येथे विक्री करीता येणार आहे . अशी खात्रिशिर वातमी मिळाली होती. गोपणीय बातमीदार यांचेकडुन मिळाले वर्णणाचा इसम हा परीख पुलाजवळ अॅक्टीव्हा मोपेट मोटर सायकल घेवुन कोणाची तरी वाट पाहत थांबला होता. त्या वेळी त्यास गुन्हे शोध पथकाने पकडुन त्यास नांव पत्ता विचारता त्याने आपले नांव सुदेश उर्फ समाधान सुरेश माने वय २० रा. उचगांव ता.करवीर जि.कोल्हापूर असे सांगितले.त्या वेळी त्याचेकडे अॅक्टीव्हा बाबत चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु

त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने आपण सदरची ॲक्टीवा मोपेट मोटर सायकल ही गेले १० ते १२ दिवसा पुर्वी रेसीडन्सीक्लब जवळुन चोरी केलेची कबुली दिली. त्या वेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे खिशामध्ये सोन्याचे गंठण, लहान सोन्याच्या अंगठया, लहान पैंजण जोड , रोख रक्कम चिल्लर असे मिळुन आलेने त्याचेकडे सदर सोन्याचे चांदीचे दागिने बाबत चौकशी केली असता प्रथम त्याने मला माझे मित्रिणीने दिले असल्याचे सांगितले परंतु त्याचे मैत्रिणीकडे चौकशी केली असता तिने आपणे कोणतेही सोन्याचे, चांदीचे दागिने दिले नसल्याचे सांगितले. त्याचे कडे सोन्याचे दागिने बाबत अधिक चौकशी केली असता त्याने दिनांक ४-५-२०२२ रोजी दुपारी तामगांव येथील प्रसाद किरणा स्टोअर्स नावाचे दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील तिजोरी फोडुन सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली आहे.सदर इसमास तपास कामी शाहुपूरी पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हयाचे तपास कामी अटक करण्यात आली असता तपासामध्ये त्याने आपण उचगांव येथे गेले एक महिण्यापुर्वी मंगेश्वर कॉलनी येथे एका घरासमोर पार्क केलेली स्पेंन्डर मोटर सायकल चोरी केल्याची कबुली देवुन ती मोटर सायकल उचगांव येथे घरी असल्याचे

सांगितलने सदरची मोटर सायकल ही जप्त करणेत आली आहे.वरील प्रमाणे इमस नामे सुदेश उर्फ समाधान सुरेश माने वय २० रा. उचगांव ता.करवीर जि.कोल्हापूर याचेकडुन मोटर सायकल चोरीचे ०२ गुन्हे व घरफोडीचा ०१ गुन्हा उघडीकस आलेला आहे. आरोपीकडुन

खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणुन मुद्देमाल जप्त केला आहे.

१) शाहुपूरी पोलीस ठाणे गुरनं ३१५/२०२२ भादंविस कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील अक्टिवा मोपेड मोटर सायकल एक

२) गांधीनगर पोलीस ठाणे गुरनं ८०/२०२२ भादंविस कलम ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील स्पैन्डर मोटरसायकल एक

३) गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे गुरनं ८१/२०२२ भादंविस कलम ४५४,३८० प्रमाणे दाखल गुन्हयातील २ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण एक ,४ लहान सोन्याच्या अंगठया, ३ लहान पैंजण जोड व रोख रक्कम त्यामध्ये १० रुव ५ रु दराची चिल्लर २५० रु वरील प्रमाणे सुमारे २ लाखाचा मुद्देताल जप्त करणेत आला आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक सो,कोल्हापूर, मा. अपर पोलीस अधिक्षक सो.कोल्हापूर ,उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग कोल्हापूर पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांचे मार्गदर्शनाखाली शाहुपुरी पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख श्रीकांत इंगवले सहा.पोलीस निरीक्षक,पोहेकॉ ऋषीकेश पवार, पो ना युवराज पाटील, मिलिंद बांगर, पोकॉ लखन पाटील,शुभम संकपाळ, सागर माने,विकास चौगुले यांनी केली आहे.सदर गुन्हयाचा तपास सहा. फौजदार जे डी रजपुत हे करीत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *