राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उदघाटन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले…!

विशेष वृत्त अजय शिंगे

कोल्हापूर//प्रतिनिधी दि.६ : संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे १०१ वे स्मृती वर्ष तसेच लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक संचालनालय मार्फत घेण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उदघाटन आज वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित देशमुखजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

Advertisements

हे वर्ष नाट्यरसिक, कलेचे आश्रयदाता व कोल्हापूरला कलानगरी म्हणून ओळख मिळवून देणारे राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. या निमीत्त राज्यनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात घेण्याच्या कोल्हापूरकरांच्या विनंतीस मान दिल्याबद्दल ना. अमित देशमुख यांचे मनःपूर्वक आभार!

यावर्षीच्या स्पर्धेत १९ केंद्रांवरील प्राथमिक फेरीत ३५६ नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला होता. यापैकी प्राथमिक फेरीतील ३४ नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली आहे. प्राथमिक फेरीत ‘नेटवर्क २४ X ७’ ला कोल्हापूर विभागातून प्रथम क्रमांक मिळाला, तर शिवाजी विद्यापीठाच्या ‘अंधयुग’ ला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. 

या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या संस्था, कलाकार व तंत्रज्ञ यांना प्रयोग सादरीकरणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! या स्पर्धेमुळे आपल्या कलानगरीतील कलाकार, रसिक प्रेक्षक यांना या निवडक ३४ नाटके पाहण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. मला खात्री आहे या अंतिम फेरीतील सर्वच नाटकांना कोल्हापूरकर नक्कीच उत्स्फुर्त प्रतिसाद देतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *