Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त खासबाग मैदान येथे आयोजित महा – ताल या वादय महोत्सवाचे आज उद्घाटन करण्यात आले.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलेला प्रोत्साहन दिले , गुणी माणसांची पारख केली . आजही राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि कार्य दीपस्तंभासारखे आहेत.
खासबाग मैदान उभारुन त्यांनी कोल्हापुराला कुस्ती पंढरीचा मान मिळवून दिला. नाट्य, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या त्यांच्या या अलौकिक कार्यामुळे अनेक दिग्गज येथे घडले.कोल्हापूर येथे व्यापार वाढावा यासाठी शाहुपूरी बाजारपेठेची स्थापना करण्याबरोबरच जयसिंगपूर ही व्यापारपेठ निर्माण केली. यामुळे कोल्हापूरचा आर्थिक विकास झपाट्याने होऊ लागला.
यावेळी राजस्थानी गायक मामे खान यांच्या चमूने पारंपारिक राजस्थानी लोकगीते तसेच चित्रपट गीते तर प्रख्यात बासरीवादक हरीप्रसाद चौरासिया यांचे पुतणे पंडीत .राकेश चौरासिया व त्यांच्या राकेश अँड फ्रेण्ड ग्रुपने सुरेल बासरीवादन केले.
खासबाग मैदान येथे दि. ७ मे पर्यंत चालणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवाचा कोल्हापूरवासियांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले.
यावेळी व्यासपीठावर राजस्थान येथील मामे खान रॉक्स अँड रूट्स तसेच पंडित राकेश चौरासिया अँड फ्रेंडचे सदस्य , विजय देवणे, आदिल फरास , चित्रनगरीचे संचालक संजय पाटील ,सांस्कृतिक कार्य संचनालयाचे संचालक बीभीषण चवरे आदी उपस्थित होते .