कोल्हापूर/प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने १८ मे ते २२ मे पर्यंत सुरू असणाऱ्या कृतज्ञता पर्वा निमित्ताने ६ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी १०० सेकंद जिथे असाल तिथे स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहण्यात आली…
यानिमित्त आम्ही_शाहूपूरीकर व्यासपीठाच्या पुढाकारातून शाहूपुरी बॉईज व स्वराज्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने पूनम काटे राकेश काटे , Parikshti Satam , Sandip Dhere यांच्या वतीने शाहूपुरी मधील सर्व नागरिकांना मारूती मंदिर, शाहूपुरी ५ वी गल्ली येथे भागातील सर्व बंधू भगिनींनी एकत्र येऊन आणि ज्यांना या ठिकाणी उपस्थित राहता आले नाही त्यांनी असेल त्या ठिकाणी उभे राहून १०० सेकंद स्तब्धता पाळून लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली……..