विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली अंबाबाई मंदिराला भेट…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज अंबाबाई मंदिराला भेट देऊन मंदिराची व परिसराची पाहणी केली यामध्ये त्यांनी मंदिरातील सुरू असणारी विकास कामे यांचा आढावा घेतला. मंदिरातील संगमरवरी फरशी काढण्याच्या कामाबद्दलची माहिती घेऊन गळती संबंधी काही समस्या असल्याबाबत विचारणा केली. पिण्याचे पाणी व स्वच्छतेच्या समस्यांविषयी जाणून घेतले. त्याचबरोबर त्यांनी अंबाबाई विकास आराखड्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले त्यासाठी त्यांनी संपूर्ण मंदिराची अंबाबाई विकास आराखडा संबंधी आवश्यक असणारी पाहणी केली. त्यांनी मंदिरातील अभिषेक पद्धती व पूजा याबाबत माहिती जाणून घेतली.

लॉकडाऊन काळात मंदिरात केलेल्या उपाय योजना व सुरू असलेली विकास कामे या संदर्भातील माहिती व ऑनलाईन देणगी संदर्भातील सुरू असणाऱ्या सुलभ प्रक्रिया याबाबत माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव  शिवराज नाईकवाडे यांनी दिली. यावेळी देवस्थान समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या देवस्थान सेवा योजनेमध्ये सहभागी होण्याची इच्छा नीलम ताईंनी व्यक्त केली त्याबाबत मंत्रालयीन स्तरावर बैठक आयोजित करणेबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Advertisements

               करवीर तहसीलदार श्रीमती भामरे मुळे, पन्हाळा नायब तहसीलदार श्री विनय कौलवकर, देवस्थान सचिव शिवराज नाईकवाडे, मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *