कोल्हापूर/प्रतिनिधी : थैलेसिमिया, हिमोफिलीया, सिकलसेल, ॲनिमिया इतर आजारी रुग्णांसाठी कार्यरत समवेदना मेडीकल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बर्कत पन्हाळकर यानां ॲस्टर सीएमआय ॲवार्ड देवून नुकतेच गौरविण्यात आले. या रक्त विकार सारख्ये गंभीर आजाराचे गांभीर्य बघून रुग्णांच्या उपचारासाठी अहोरात्र झटत आहेत, सरकारी व खासगी रुग्णालयामध्ये डे केअरसाठी पाठपुरावा करून योग्य उपचार मिळवून देत आसून राज्य परराज्यात मोठ मोठे शिबीर व मोफत तपासण्या करून आजारग्रस्त मुलांच्यासाठी संकल्प राबवून
फौंडेशनच्या माध्यमातून थैलेसिमिया डे केअर सेंटर, बोनमॅरो, किडनी, लिव्हर ट्रान्स्प्लांट मोफत व माफक दरात व्हावे म्हणून शासन व आरोग्य प्रशासना बरोबर सतत पाठपुरावा करीत आहेत. तसेच समवेदना मेडीकल फौंडेशनच्या माध्यमातून उल्लेखनिय कामगिरी करून गोरगरीब व इतरांसाठी झटणारे व उत्कृष्ठ व कुशल मानव आरोग्य सेवा बजावित असल्यामुळे यांच्या कार्याची दखल घेवून अनेक संस्थांनी सन्मानित केले आहे .थैलेसिमिया मुलांच्यासाठी काम करीत असतानां थैलेसिमिया दीनाचे औचित्य साधुन बेंगलोर येथील ॲस्टर सीएमआय हॉस्पीटल तरफे पन्हाळकर यानां समाजरत्न पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
या आनंद सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून म्हैसुरचे जेष्ठ बालरोग तज्ञ डॉ. रवि एम. डी, बेंगलोरचे रक्तविकार तज्ञ डॉ. स्टॅलिन रामप्रकाश, डॉ. रघुराम. सी.पी, बालरोग तज्ञ डॉ.चेतन जिनिगेरी.राजेश गजेंद्र, सुरेश.इरुदयराज, ओडीसा थैलेसिमिया सोसायटीचे सेक्रेटरी निरकर पांडा, टोपू चव्हाण, अशोक पाटीलसह कर्नाटक मधील थैलेसिमिया मुले व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.