दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात दुःखद निधन….!

Media Control Online

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ अपघात झाला. सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री १०.३० वाजता झाला. सायमंड्स स्वतः कार चालवत होते. अचानक त्यांची कार रस्ता सोडून उलटली. घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्कालीन सेवांनी सायमंडला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो जखमी झाला. हा अपघात कसा झाला याचा तपास फॉरेन्सिक क्रॅश युनिट करत आहे, अशी माहिती क्वीन्सलँड पोलिसांनी एका निवेदनातून दिली आहे.

Advertisements

ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी सामने खेळलेल्या सायमंड्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. सायमंड्स हा १९९९-२००७ च्या क्रिकेट विश्वावर राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचा महत्त्वाचा भाग होता. संघसहकाऱ्याच्या आकस्मिक मृत्यूच्या वृत्तावर माजी यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्टने शोक व्यक्त केला. या वृत्ताने खूप दुःखी झालोय, असं गिलख्रिस्टने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सायमंड्सच्या निधनामुळे ऑस्ट्रेलियासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. रॉड मार्श आणि शेन वॉर्नसारख्या दिग्गजांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर सायमंड्सचे या वर्षी निधन होणे अत्यंत क्लेशदायक आहे. ‘क्रिकेटसाठी हा आणखी एक दुःखाचा दिवस आहे’, असं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरने म्हटलंय. मैदानावर आणि त्यापलीकडेही आमचे सुंदर नाते होते, असं पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *