Share Now
MEDIA CONTROL ONLINE
महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतही करोनाने पुन्हा हात-पाय पसरवायला सुरुवात केली आहे. मुंबई शहराच्या लगतच्या परिसरात करोनाचे आकडे वाढल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात करोनाची चौथी लाट असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गेले चार दिवस सतत करोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मात्र, सोमवारी काही अंशी दिलासा मिळाला आहे. सोमवारी राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. राज्यात काल १,०३६ आणि मुंबईत ६७६ नवीन रुग्ण सापडले आहेत. रविवारी चाचण्यांच्या संख्येत घट झाल्याने करोना रुग्णांच्या संख्येतही घट दिसून आली. रुग्णवाढीनंतर राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७,४२९ इतकी आहे तर, एकट्या मुंबईत ५, २३८ रुग्ण आहेत. शहराचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर ८.८२ टक्के आहे..
Share Now