कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका शाहुपूरी परिसरामध्ये उघडयावर जैव वैद्यकिय कचरा टाकलेबद्दल पद्मावती डिस्ट्रीब्युटर्स व भ्रम्ही आयुर्वेदिक औषधलयांना आज नोटीसा बजाविण्यात आल्या. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शाहूपूरी परिसरात फिरती करताना उघडयावर जैव वैद्यकिय कचरा पसरल्याचे निदर्शनास आले. दैनंदिन कचऱ्यामध्ये जैव वैद्यकिय कचऱ्यामध्ये पद्मावती डिस्ट्रीब्युटर्स व श्री भ्रम्ही आयुर्वेदिक औषधालय या आस्थानपाचे लेटर हेड असलेले पावत्या सापडलेल्या आहेत. त्यामुळे या वैद्यकिय व्यावसायिक धारकांना महानरगपालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे
शाहुपूरी परिसरामध्ये उघडयावर जैव वैद्यकिय कचरा टाकलेबद्दल पद्मावती डिस्ट्रीब्युटर्स व भ्रम्ही आयुर्वेदिक औषधलयांना नोटीसा
