Getting your Trinity Audio player ready...
|
Media Control Online
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सर्व आमदारांना ‘हॉटेल ताज’ मध्ये ठेवलं होतं. मात्र आमदार जगताप आणि आमदार टिळक आजारी असल्याने हॉटेलमध्ये नव्हते.
गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांना मतदानासाठी विधान भवनात आणण्यात आलं आहे. पुण्याहून एअर लिफ्ट करुन त्यांना मुंबईत भल्या सकाळीच आणण्यात आलंय. राज्यसभा निवडणुकीत एकही मत वाया जाऊ नये, म्हणून भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. थोड्याच वेळात मुक्ता टिळक आपला मतदानाचा अधिकार बजावतील.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या सर्व आमदारांना ‘हॉटेल ताज’ मध्ये ठेवलं होतं. मात्र आमदार जगताप आणि आमदार टिळक आजारी असल्याने हॉटेलमध्ये नव्हते. मतदानादिवशी सकाळी विधिमंडळात आणण्याचं नियोजन भाजपने केले. त्यानुसार सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास टिळक आणि आमदार जगताप यांना विधिमंडळात आणण्यात आले. मुक्ता टिळक यांना तर स्ट्रेचरवर बसून विधिमंडळात आणण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत आमदार गिरीश महाजन होते