Share Now
Read Time:1 Minute, 12 Second
Media Control Online
राज्यसभा निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचं ठरत असताना न्यायालयाकडून नवाब मलिक यांच्या मतदानाबाबत तातडीचा दिलासा न मिळाल्याने महाविकास आघाडीच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. मलिक यांना आता आपल्या याचिकेत दुरुस्ती करून पुन्हा कोर्टात जावं लागणार आहे.
आम्ही जामीन मिळण्यासाठी आललो नाही. केवळ काही तासांसाठी सोडण्याची विनंती करण्यासाठी आलो आहोत. हायकोर्टाला राज्यघटनेच्या अनुच्छेद २२६ अन्वये असलेल्या विशेष अधिकारात तसा आदेश देता येतो. मात्र आम्ही जामीन मागत नसून लोकप्रतिनिधी म्हणून मतदान करण्याच्या असलेला घटनात्मक हक्क व माझ्या कर्तव्याची पूर्तता या कारणासाठी हायकोर्टात आलो आहोत, असा युक्तिवाद मलिक यांच्या वतीने अमित देसाई यांनी केला.
Share Now