डॉ. अर्जुन कुंभार यांच्या योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:3 Minute, 28 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी :  १५ जुन २०२२ रोजी फुलेवाडी कोल्हापूर येथील दत्त मंदिराजवळील बागेत डॉ अर्जुन कुंभार फुलेवाडी कोल्हापूर यांनी ध्यान वर्ग आयोजीत केला होता. सायंकाळी ६ वाजता फुलेवाडी परिसरातील ७० ज्येष्ठ नागरिकांनी या ध्यान वर्गाचा लाभ घेतला.या वेळी डॉ अर्जुन कुंभार यांनी ध्यान म्हणजे काय? ध्यान कसे करायचे? का करायचे? धायानाचे फायदे काय? ध्यान कोण करू शकतो? ध्यान कोठे करू शकतो?याचे सुंदर व साध्या भाषेत स्पष्टीकरण करून सांगितले.तसेच प्रत्याक्ष ध्यान करून घातले. ध्यान म्हणजे आपल्या नैसर्गिक श्वासाशी एकरूप होऊन विचारशून्य अवस्थेत जाणे होय.आपणास होणारे ८० ते ९० टक्के आजार हे आपल्या विचारामुळे आपणच निर्माण करत असतो.आपण विचारशून्य अवस्थेत गेल्यानंतर मन शांत होते.आपल्या शरीरात असणाऱ्या ७२०० नाड्या तून वैश्विक ऊर्जा आपल्या शरीरात पसरते व आपले सर्व शारिरीक व मानसिक आजार बरे होतात.

परंतू आपण नियमीत ध्यान करणे आवश्यक आहे.५ वर्षां पासून शेवटच्या श्वासापर्यंत आपण ध्यान करू शकतो. स्री ,पुरुष, मुले सर्व ध्यान करू शकतो.हे ध्यान विनामुल्य आहे.सर्वांनी नीरोगी व आनंदी व्हावे यासाठी ब्रम्हश्री पितामह पत्री जी गेल्या ४० वर्षां पासून आना पाना सती ध्यानाचा प्रचार व प्रसार करत आहेत.जगभरात लाखो लोक ध्यानाने निरोगी व आनंदी जीवन जगत आहेत.ध्यानामुळे मन शांत होते.शारिरीक व मानसिक आजार बरे होतात स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता , आत्मविश्वास वाढतो. निरपेक्ष मैत्रीपूर्ण तणावमुक्त व आरोग्यपूर्ण जीवन जगता येते.बुद्धीचा विकास , आध्यात्मिक उन्नती होते. म्हणून सर्वांनी कमीत कमी आपल्या वयाच्या मिनिटे येवढे तरी ध्यान करणे आवश्यक आहे.( वय ६०-६० मिनिटे ध्यान)दररोज सायं ६ वाजाता डॉक्टर कुंभार सर्वासाठी मोफत ध्यान वर्ग घेणार आहेत.तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आहावन डॉक्टर कुंभार यांनी केले आहे.

डॉ ज. ल. नागावकर व सौ नीला नागावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी सगळ्या लोकांना चॉकलेट वाटून ध्यानर्गाची सांगता केली ७० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते मानो नही जानो ——-सर्वासाठी ध्यान NO DOCTOR NO MEDICINE 💊💊💊

संपर्क डॉ. अर्जुन कुंभार 9421266432

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *